मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 11, 2025 at 01:23 AM
*बच्चुभाऊ कडू यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज अमरावतीत*
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण काळात माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसोबत मध्यस्थी करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
शेतीमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, कर्जमाफी अशा १७ मागण्यासाठी मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ बच्चुभाऊ कडू यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
बच्चुभाऊ कडू हे आंदोलनातून, जनतेच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवत पुढे आलेले नेतृत्व आहे. बहुतांश शेतकरी मराठा आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न हे मराठ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे बच्चुभाऊ कडू यांना बळ देण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जंरागे पाटील आज सायंकाळी चार वाजता मोझरी येथे आंदोलनस्थळी जाऊन बच्चुभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा देणार आहेत.
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

👍
🙏
4