मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 11, 2025 at 01:43 AM
वाढदिवस तेजोमय नेतृत्वाचा!💐 प्रख्यात वक्ते, शिवचरित्रकार, राष्ट्रीय प्रबोधनकार ज्ञानदेव काशिद यांचा ११ जून रोजी वाढदिवस. बीड जिल्ह्यातून पुढे येत आपल्या वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले ज्ञानदेव काशिद एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आहे. शिवचरित्र आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे ते अभ्यासक आहेत. लहानपणापासूनच त्यांना वक्तृत्वाची आवड आहे. वाचन, गडकिल्ले पर्यटन हे त्यांचे छंद आहेत. आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांनी अनेक गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्थळांचा मागोवा घेतलेला आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण चळवळीत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या व्याख्यानमालेत त्यांनी शिवचरित्र, फुले, शाहू, आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने प्रबोधनपर व्याख्याने दिलेली आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे जागरण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारी व्याख्याने, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आदि विषयावर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. मराठी भाषेवरचे त्यांचे प्रेम, मराठी संस्कृती, माती-माणसे यावर जीवापाड प्रेम करणारे ज्ञानदेव काशिद एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. इतिहासाचा डोळसपणे अभ्यास करून वर्तमान परिस्थितीत अनुकरणीय इतिहास ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधन कार्याची नोंद घेऊन आजवर त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाविद्यालयीन जीवनात तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ हा पुरस्कार पटकावलेला आहे. बीड येथील नामांकित बलभीम महाविद्यालयाचा ‘बलभीम’ पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत ते विजेते राहिलेले आहेत. विविध सामाजिक संघटनांकडून ‘उत्कृष्ट वक्ता’ म्हणून अत्यंत मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर कोरलेले आहेत. अत्यंत जिद्दी, प्रचंड मेहनती, ध्येयासाठी झपाटून काम करणे हा त्यांचा जीवनक्रम आहे. अनेक सभा, संमेलने यशस्वी करण्यासाठी त्यांनी मौलिक असे योगदान दिलेले आहे. यशाच्या उत्तुंग शिखरांवर पोहोचूनही मातीतल्या सर्वसामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. व्यक्ती एक पण एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढण्यास तरबेज असलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. वाढदिवस एक निमित्त आहे पण दररोजच ज्ञानदेव काशिद यांच्यासोबत आमच्या सदिच्छा आहेत. एका अभ्यासू आणि हरहुन्नरी व्यक्तीच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देताना हे ओजस्वी वाणी लाभलेले नेतृत्व अधिक तेजोमय होवो. त्यांच्या कर्तृत्ववाला अधिकाधिक बहर येतो. त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहो ह्याच शुभेच्छा. शुभेच्छुक: मनोज दादावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील सर्व चाहते Dnyandev Kashid - ज्ञानदेव काशिद Manoj Jarange Patil Official DG Rock Amol Taur Uday Bhise Patil Badrinath Tarakh Patil Ramesh Pokale Aniket Deshmane Royal Maratha #happybirthday #वाढदिवस #शुभेच्छा #dnyandevkashid #ज्ञानदेवकाशिद #11june
Image from मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र: वाढदिवस तेजोमय नेतृत्वाचा!💐  प्रख्यात वक्ते, शिवचरित्रकार, राष्ट्रीय ...
💐 ❤️ 🙏 4

Comments