Current Affairs by Pratik Babar Sir
Current Affairs by Pratik Babar Sir
June 10, 2025 at 06:17 AM
शुभांशु शुक्ला यांची कारकीर्द ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला उत्तर प्रदेशातील लखनऊचे रहिवासी आहेत. शुभांशू यांनी लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले. २००५ मध्ये एनडीएमधून पदवी घेतल्यानंतर, जून २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर २२८ आणि एएन-३२ ही लढाऊ विमाने उडवलेली आहेत. २०१९ मध्ये त्यांना विंग कमांडर आणि मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर बढती मिळालेली आहे. आता ते अंतराळात प्रयोग करताना दिसणार आहेत.
Image from Current Affairs by Pratik Babar Sir: शुभांशु शुक्ला यांची कारकीर्द  ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला उत्तर प्रदे...

Comments