Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
May 27, 2025 at 06:09 AM
काल खोपोली, रायगड येथे RBL बँकेच्या “उमेद” या CSR उपक्रमांतर्गत २०० सायकल आणि शालेय साहित्य संच वाटप समारंभात सहभागी झाले. महिला व बालविकास मंत्री म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, शिक्षण ही प्रत्येक मुलीची शक्ती आणि स्वप्नांची पायरी असते. या सायकली केवळ प्रवासाचे साधन नाहीत, तर त्या त्यांच्या स्वप्नांना नवे पंख देणाऱ्या आशेच्या सायकली आहेत. या मुलींनी नव्या जोमाने शाळेत जाऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, हीच माझी सदिच्छा. RBL बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार. यावेळी RBL बँकेच्या वरिष्ठ अधिकारी CSR व्यवस्थापक श्रीमती रेखा बोरले, नवीन अर्थव्यवस्था व भांडवली बाजार विभागाचे श्री रोहित अग्रवाल, महाराष्ट्र/गोवा सरकारी बँकिंग प्रमुख श्री मिलिंद विचारे, तसेच प्रादेशिक विपणन व्यवस्थापक श्री अजित सूर्यराव आदी मान्यवर उपस्थित होते. 📍https://x.com/iAditiTatkare/status/1927033889639248104?t=t1Fbi0BEHAjTRqU0fM9APA&s=19
Image from Aditi Varda Sunil Tatkare: काल खोपोली, रायगड येथे RBL बँकेच्या “उमेद” या CSR उपक्रमांतर्गत २०० सा...
👍 ❤️ 13

Comments