Aditi Varda Sunil Tatkare
May 28, 2025 at 03:24 PM
आज मंत्रालयातील दालनात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत बैठक घेतली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता त्यांच्या एकत्रित कामावर आधारित होता, परंतु आता अंगणवाडी केंद्रांकरिता निकष निश्चित करण्यात येतील.
बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पूर्वशालेय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येईल. अंगणवाडी केंद्रांचे गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करून त्यानुसारच प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
याच बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे” वितरण करण्याचा निर्णयही झाला.
या बैठकीस राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर (दूरदृश्यप्रणालीद्वारे), महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सह सचिव वी. रा. ठाकूर, उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.
📍https://x.com/iAditiTatkare/status/1927732252613742604?t=-jp31Z_ojMV9Il7ti8F5yw&s=19

👍
❤️
🙏
5