Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
May 31, 2025 at 06:11 AM
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जयंती दिन..! जगाच्या पाठीवर अनेक बलाढ्य शासक होऊन गेले, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. म्हणूनच कल्याणकारी, लोकाभिमुख प्रशासनाचा अभ्यास करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा अभ्यास करणं आजही कालसुसंगत ठरतं. एकविसाव्या शतकातील भारताचे धोरण व प्रशासन हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अठराव्या शतकात राबवलेल्या धोरणांना आदर्श मानते यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची व महानतेची प्रचिती येते. महिला व बालकल्याण विभाग म्हणून महाराष्ट्रातील महिलांच्या, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असताना आम्हीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख धोरणाला आदर्श मानून वाटचाल करत आहोत. जनहितासाठी जीवन समर्पित करणाऱ्या कल्याणकारी शासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #ahilyabaiholkar 📍https://x.com/iAditiTatkare/status/1928668599155372524?t=YtEelkTE70Xzx-gjnWlXgg&s=19
🙏 👍 9

Comments