Aditi Varda Sunil Tatkare
June 11, 2025 at 04:49 PM
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पर्यटनाच्या वाढीसाठी, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी विविध उपायोजना राबवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आज श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धनच्या एकत्रित विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री दालन, मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व खा. श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाच्या विकासासाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मारळ येथील अवकाश निरीक्षण (स्टार गेझिंग) प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीस पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजुरी दिली जाईल असे श्री. अजितदादा पवार यांनी आश्वस्त केले. तसेच, दिवेआगर येथील मत्सालयाच्या निर्मितीसाठी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारला ६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. निसर्गाचे बहुमूल्य वरदान व समृद्ध असा सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेल्या या सर्व क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी, पर्यटनाच्या व रोजगाराच्या वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
या बैठकीस माझ्यासह राज्याचे पर्यटन राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक, श्री. ओ.पी. गुप्ता, श्रीमती मनीषा म्हैसकर, श्री. राजगोपाल देवरा व इतर अधिकारी उपस्थित होते.
👍
3