Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
June 11, 2025 at 05:51 PM
उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व खा.श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री दालन, मंत्रालय येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती, माणगाव व इंदापूर येथील बायपास व महामार्गावरील वाहतुकीचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई - गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी बैठकीत दिले. मागील महिन्यात आदरणीय श्री. अजितदादा पवार यांनी लोणेरे (ता. माणगाव) येथे प्रत्यक्ष भेट देऊन महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली खा. सुनिल तटकरे साहेब व माझ्या उपस्थितीत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या होत्या, त्यासंदर्भातही आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई - गोवा महामार्ग हे अत्यंत महत्त्वाचे साधन ठरणार. आदरणीय श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार हा मला विश्वास आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्री. राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) श्री. संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी श्री. किसन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभाग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Image from Aditi Varda Sunil Tatkare: उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व खा.श्री. सुन...
❤️ 😂 2

Comments