
Pankaj Rahangdale ✅
May 17, 2025 at 02:41 PM
पिंडकेपार प्रकल्प पुनरुज्जीवित करणार!!
सन १९८२-८३ मधे पिंडकेपार प्रकल्प मंजूर करण्यात आला. तेव्हा त्याची एकूण लागत २.४३ कोटी रुपये होती. मात्र तत्कालीन सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला नाही आणि प्रकल्प रेंगाळला. आज त्या प्रकल्पाची किंमत १०० कोटी पेक्षा अधिक झाली आहे. सोबतच जो खर्च त्यावर झाला तो सुद्धा वाया गेला. जर हा प्रकल्प झाला असत तर ११७० हेक्टर जमिनीचे सिंचन झाले असते यामुळे चुटिया, रापेवाडा, पिंडकेपार तसेच परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध झाले असते आणि गोंदिया शहराला सुद्धा पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात आला असता. आता प्रकल्पच बंद करण्यात आला आहे. मात्र हा प्रकल्प व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
