Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
May 23, 2025 at 06:56 PM
देशभक्तीचा जागर: आमगांव मध्ये भव्य तिरंगा रॅली..!!🇮🇳🇮🇳 दि. २३-०५-२०२५ रोजी आमगांव येथे भारतीय जनता पक्ष व स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने दाखवलेल्या पराक्रमास सलाम आणि राष्ट्राच्या अखंडतेचा निर्धार व्यक्त करण्यासाठी ही रॅली निघाली. या रॅलीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद या घोषणांनी संपूर्ण आमगाव देशभक्तीने भारले गेले. दहशतवादाविरोधात संताप आणि भारतीय सेनेबद्दल अभिमान व्यक्त करणारी ही रॅली म्हणजे एक सार्वजनिक जागृती नव्हे तर जनतेचा राष्ट्रासाठीचा जागर होता. भारतीय जनता पक्षासाठी ही केवळ एक रॅली नव्हे, तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात देशप्रेमाची मशाल पेटवण्याचा निर्धार आहे. आमदार मा. श्री. संजय पुराम ६६-आमगाव-देवरी, विधानसभा महाराष्ट्र
Image from Sanjay Puram ✅: देशभक्तीचा जागर: आमगांव मध्ये भव्य तिरंगा रॅली..!!🇮🇳🇮🇳  दि. २३-०५-...

Comments