Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
June 1, 2025 at 03:45 AM
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त देवरीत प्रेरणादायी गौरव समारंभ...! दि. ३१-०५-२०२५ रोजी देवरी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी आणि उत्साही गौरव समारंभ संपन्न झाला. या सोहळ्यात इयत्ता १०वी व १२वी मध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीसोबतच पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि समाजाचे योगदान आहे. विशेष बाब म्हणजे, समाज माध्यमांद्वारे सकारात्मक विचार प्रसारित करणाऱ्या एका युवा Influencer चा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नव्या पिढीला योग्य दिशादर्शन आणि प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम स्तुत्य ठरला. त्याप्रसंगी या कार्यक्रमात उपस्थित: सौ. सविता पुराम (माजी सभापती व सदस्य, जि.प. गोंदिया), मा. श्री. अनिलजी बिसेन (सभापती, पं.स. देवरी), मा. श्री. विनोदजी भेंडारकर (तालुका महामंत्री, भा.ज.पा., देवरी), मा. श्री. संजयजी उईके (तालुका अध्यक्ष, भा.ज.पा., देवरी), मा. श्री. प्रविणजी दाहिकर (माजी तालुका अध्यक्ष, भा.ज.पा., देवरी), मा. श्री. इंद्रजीतजी भाटिया (भा.ज.पा.महामंत्री, देवरी), तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे सेवाभाव, न्यायप्रियता आणि समाजहिताचा सर्वोत्तम आदर्श आहे. त्यांच्याच आदर्शाने प्रेरित होऊन भारतीय जनता पक्ष नव्या पिढीला शिक्षण, संस्कार आणि नेतृत्वाचे मूल्य रुजवण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र
Image from Sanjay Puram ✅: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त देवरीत प्रेरणादा...

Comments