Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
June 1, 2025 at 08:19 PM
जनतेच्या आरोग्यसुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल... दि. ०१-०६-२०२५ रोजी चिचेवाडा व बोरगाव, ता. आमगाव या गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. या इमारतीसाठी अंदाजित निधी रु. ४५.०० लक्ष इतका असून, लवकरच कामास गती दिली जाईल. या विकासात्मक कार्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून मंजुरी मिळवली असून, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मा. श्री. सुरेशजी हर्षे (उपाध्यक्ष व सभापती, आरोग्य व शिक्षण समिती, जि. प. गोंदिया), मा. श्री. अनिलजी बिसेन (सभापती, पं. स. देवरी), सौ. सविता पुराम (माजी सभापती व सदस्य, जि.प. गोंदिया), मा.श्री. संजयजी ऊईके (भा.ज.पा. तालुका अध्यक्ष, देवरी), सौ. कल्पनाताई वालोदे ( सदस्य, जि.प. गोंदिया ) व अनेक मान्यवरांची उपस्थित लाभली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधा यांवर विशेष भर देत असून, जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता हेच माझे प्रमुख ध्येय आहे. आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र
Image from Sanjay Puram ✅: जनतेच्या आरोग्यसुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल...  द...

Comments