Sanjay Puram ✅
June 7, 2025 at 08:04 PM
आज दिनांक 7/6/2025 ला देवरी येथे अ क्रॅश डान्स अकॅडमी आणि झुबा फिटनेस एज्युकेशन यांच्यातर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमाने, आपल्या देवरी तालुक्यातील कलावंतांच्या आणि नवउदयोन्मुख प्रतिभांचा सन्मान केला आहे याचा मला अतिशय अभिमान वाटतो.
युवकांच्या कलात्मक आणि बौद्धिक विकासासाठी आपण राजकीय पातळीवर कला, क्रीडा आणि फिटनेस क्षेत्राला अधिकाधिक प्रोत्साहन देणार आहोत. कारण आजचा युवा, तो केवळ स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीच्या मागे धावत नाही, तर आपल्या संस्कृती, आरोग्य आणि कलेच्या माध्यमातूनही स्वतःचा ठसा उमटवत आहे.
आमदार मा. श्री. संजय पुराम
आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र