Marathi Varg
Marathi Varg
June 1, 2025 at 02:40 PM
जिल्ह्यासह राज्याच्या सर्व वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाचे...* *✅ महत्त्वाची सूचना* ✅ *(वाचा आणि इतर शिक्षकांना व आपल्या शाळांच्या ग्रुप वर फॉरवर्ड करा)* *उद्या दिनांक २/६/२०२५ पासून ते १२/०६/२०२५ (बकरी ईदची दिनांक ७/०६/२०२५ रोजीची एक सुट्टी वगळता रविवारसह सर्व दिवशी) सकाळी ९:१५ ते सायंकाळ ५:३० या वेळेत १० दिवसांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरु होत आहे.* *हे प्रशिक्षण ऑफलाइन स्वरुपाचे आहे मात्र रोजची उपस्थिती, दररोजच्या परीक्षा, एक दिवसाआड होणारे स्वाध्यायाचे गुण इत्यादी बाबींचा नोंद ऑनलाइन आणि दिलेल्या वेळेतच होणार असल्यामुळे सर्व शिक्षक वेळेत प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहून सर्व नोंदी वेळच्या वेळी पूर्ण होणे गरजेचे आहे.* *दरदिवशी सकाळी ९:१५ ते ९:३० या वेळेत उपस्थिती ऑनलाइन नोंदवून त्याची प्रिंट काढून त्यावर शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन पोर्टल वर upload केली जाणार आहे. याच प्रकारे रोजच्या तीन ते चार चाचण्या देखील ऑनलाइन सुरु करुन त्या त्या चाचणीच्या वेळेची उपस्थिती ऑनलाइन नोंदवून त्याची प्रिंट काढून त्यावर प्रशिक्षण्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन ती copy पोर्टल वर upload केली जाणार आहे. (प्रत्येक चाचणी त्याच तासिकेला सुरु होऊन त्याच तासिकेच्या दिलेल्या वेळेत सोडवावी लागणार आहे. तासिकेची वेळ संपल्यानंतर ती चाचणी आपोआप ब्लॉक होणार आहे.* *अशा प्रकारे रोजची केंद्रावरील सकाळची उपस्थिती आणि चाचण्यांच्या वेळेची ऑनलाइन उपस्थिती आणि त्याच उपस्थितीची पीडीएफ वरील स्वाक्षरी (उपस्थिती ऑनलाइन नोंदविल्यानंतर उपस्थित शिक्षकांचीच पीडीएफ generate होणार आहे.) इत्यादी बाबी प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत.* *यापैकी एखाद्या शिक्षकांची एकदा जरी अनुपस्थिती लागली तर त्यांचे संपूर्ण प्रशिक्षणच रद्द होईल.* *Ministry of Education, Government of India यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येथून पुढील काळात सर्वच प्रशिक्षणे अशाच पद्धतीने होणार आहेत.* *तरी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आवाहन आहे की, हे प्रशिक्षण व्यवस्थितपणे पूर्ण होण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी दररोज ९ वाजता प्रशिक्षण स्थळी पोहोचावे आणि प्रत्येक दिवसाचे सर्व कामकाज म्हणजे रोजच्या चाचण्या, स्वाध्याय वेळेत पूर्ण करावेत.* आपल्या माहितीसाठी Copy / paste

Comments