Bhimshahi Daily Update
Bhimshahi Daily Update
May 14, 2025 at 04:59 PM
*विन्रम_अभिवादन #वामनदादा 💐* *सबंध देशात बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार गिताच्या माध्यमांतून खेड्यापड्यात, वस्ती तांड्यांपर्यंत पोहचविण्याचे काम. वामनदादांनी केले..समाजामध्ये एक नवचैतन्य आणण्यासाठी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी आपल्या गीताद्वारे केले.....* *वामनदादा कर्डक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेवुन निगालेल्या पहिल्या पिढीतिल एक धमधमता निकारा बाबासाहेबांच्या विचारांची एक वावटळ, धारधार तलवार, मुलूख मैदानी तोफ...वामनदादा म्हणजे।बाबासाहेबाच्या आदोलनाच सास्कृतीक शिलेदार.आपले सबंध आयुष्य आंबेडकरीविचारच्या प्रसारासाठी मुक्तपणे उधळणारा वेडा पीर, भिमाच्या विचारांचा, अनेक कलावंत बनवणारा अमृत झरा.अशा या महान कलावंताचा गौरव करावा, मानसन्मान करावा, त्याच्या किर्तिची गोडवे गावे.म्हणून जी जी माणसे वामनदादांची गीते ऐकून वमनमय झाली ती ती मानसं एकत्र आली.बाबासाहेबाच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी या सगळ्यात दादाचे मोठेपण इतके आहे की, त्यांनी आंबेडकरी विचाराचे भांडवल करून स्वतःची महालमाडी उभी केली नाही.*
🙏 ❤️ 💙 💐 💖 😢 🥰 🫡 70

Comments