
Bhimshahi Daily Update
May 15, 2025 at 04:05 AM
*समतेचा सुर्य प्रत्येक गावकुसात उगवावा यासाठी अंधाराशी दोन हात करणारे साहित्यिक वामनदादा कर्डक मूल्य जाणिवांची पेरणी करणारे...आंबेडकरी विचार जनमानसात रुजविणारे अनेक आंबेडकरी गीतकार होऊन गेले. बाबासाहेबांना आपला ऊर्जास्त्रोत मानून पायाला भिंगरी बांधून खेड्यापाड्यापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहचविणारे आपल्या गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचार घराघरात पोहचवणाऱ्या लोकशाहिर वामनदादा कर्डक यांचा आज स्मृतिदिवस आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...💐*

❤️
🙏
💙
👍
❤
💐
🥰
66