Bhimshahi Daily Update
Bhimshahi Daily Update
May 16, 2025 at 07:24 AM
*आजच्या दिवशी 10 वर्षांपूर्वी सागर भाऊ शेजवळ याने फक्त बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून शिर्डी येथे झाली होती हत्या 10 वर्ष झाले अजूनही न्यायच्या प्रतिक्षेत✊🏻🇪🇺 सागर भाऊ शेजवळ भावा तूझं बलीदान व्यर्थ जाणार नाही.स्म्रूतिदीनी तूला मानाचा जय भिम 🥺💐* सागर हा नाशिक ला नर्सिंग कॉलेज मध्ये शिकत होता तिथेच तो आडगाव शासकीय वसतिगृहात राहत असे घरची परिस्थिती हालाखीची असताना कुटुंबीय त्याच शिक्षण करत होते. *एकदा सुट्टीत सागर,चुलत भावाच्या लग्नासाठी नाशिक वरून शिर्डी आला होता,नंतर तो एका हॉटेलमध्ये गेला तेव्हा त्याला त्याच्या आईचा फोन आला. *असता त्याची कॉलर ट्यून *"लय मजबूत भीमाचा किल्ला हे गाणं" वाजलं ,आणि हे मागेच उभे असलेले काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ऐकलं ,त्या लोकांना ते गाणं सहन नाही झालं ,त्यांनी सागर ला बोलचाल, मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी त्याला ४किमी.शिंगवे जंगल परिसरात ओढत नेवून सागरचे कपडे काढले ,त्याच्या अंगावरून गाड्या नेल्या आणि नंतर त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला .
🙏 😢 💙 ❤️ 🥹 🥺 👍 😡 😂 118

Comments