Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
May 29, 2025 at 01:49 PM
चॅटवरची नोकरी? की टास्क फ्रॉडची सुरुवात? ⚠️ . 🔹 "व्हिडीओ रेट करा आणि दररोज ₹1500 कमवा!" अशा मेसेजेसमधून सहज मिळणाऱ्या नोकरीचं आमिष दाखवलं जातं. पण ही नोकरी नसून टास्क फ्रॉडचा सापळा असतो – सुरुवातीला काम देऊन थोडा मोबदला दिला जातो, त्यानंतर मोठ्या टास्कसाठी पैसे मागितले जातात – आणि शेवटी ना टास्क मिळतो, ना पैसे परत! . 🛡️ टास्क फ्रॉडपासून वाचण्यासाठी: ✅ "थोडं काम, जास्त कमाई" अशा ऑफर्सपासून सावध राहा. ✅ नोकरी देणाऱ्या कंपनीचं नाव, रजिस्ट्रेशन आणि विश्वासार्हता तपासा. ✅ कोणत्याही कामासाठी पैसे भरायला सांगितले, तर तो फ्रॉड असू शकतो. ✅ फ्रॉड झाल्यास तात्काळ पोलिस स्टेशनशी संपर्क साधा. . 🚨 टास्क फ्रॉड टाळण्यासाठी जागरूक राहा! 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सेवेस तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . . #navimumbaipolice #taskfraud #cyberfraud #staysafe #stayalert
Image from Navi Mumbai Police: चॅटवरची नोकरी? की टास्क फ्रॉडची सुरुवात? ⚠️ . 🔹 "व्हिडीओ रेट करा आणि ...
👍 🙏 ❤️ 28

Comments