Dr Shrikant Eknath Shinde
June 5, 2025 at 01:12 AM
देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदुरची माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालत आहे याची माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय सात शिष्टमंडळांनी जगभरातील विविध देशांमध्ये भेटी देऊन भारताची दहशतवाद विरोधातील शून्य सहिष्णुतेची भूमिका ठामपणे मांडली. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. यानुसार गेले दोन आठवडे आमच्या शिष्टमंडळाने यूएई, काँगो लोकशाही प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांना भेट देऊन भारताची भूमिका मांडली.
या यशस्वी दौऱ्यानंतर आज आपल्या मायदेशी परतलो. यावेळी शिवसैनिकांनी आणि कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी सर्वप्रथम आई सौ.लता शिंदे, पत्नी सौ.वृषाली यांनी औक्षण करून स्वागत केले. तर यानंतर आजोबा श्री.संभाजी शिंदे, आईचे आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सर्व कुटुंबीयांनी एक भावनिक क्षण अनुभवला. तसेच पत्रकार बंधू - भगिनिंशी संवाद साधून या दौऱ्याबाबत माहिती दिली.
यावेळी शिवसेना मंत्री, आमदार महोदय उपस्थित होते.
❤️
🙏
👍
17