Dr Shrikant Eknath Shinde

Dr Shrikant Eknath Shinde

14.5K subscribers

Verified Channel
Dr Shrikant Eknath Shinde
Dr Shrikant Eknath Shinde
June 9, 2025 at 07:45 AM
आज सकाळी दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडून काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तर यातील जखमी नागरिकांवर कळवा आणि ठाणे येथील रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना. प्रशासनाच्या वतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. याच दरम्यान कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी तातडीने सर्व उपचार करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.
Image from Dr Shrikant Eknath Shinde: आज सकाळी दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडून काही ना...
🙏 👍 😢 ❤️ 18

Comments