
Aims Study Center
May 22, 2025 at 03:19 AM
♦️मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य
📌 मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्याने पूर्ण साक्षरतेचा दर्जा प्राप्त केल्याचे घोषित केले.
📌शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेली 95% साक्षरता दराची मर्यादा मिझोरमने ओलांडली असून यासह मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे.
📌ULLAS (Understanding Lifelong Learning for All in Society) उपक्रमांतर्गत मिझोरमने हा दर्जा प्राप्त केला आहे.
📌नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS 2023-2024) नुसार, मिझोरमचा साक्षरता दर 98.2% पर्यंत पोहोचला आहे.
📌 2011 च्या जनगणनेनुसार मिझोराम राज्याची साक्षरता दर 91.33 टक्के होती.
