⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 12, 2025 at 11:37 AM
.*गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लंडनला जाणऱ्या विमानात 242 प्रवासी आणि क्रु मेंबर्स होते. हा अपघात इतका भीषण होता की, यात बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतोय.*
दरम्यान, या अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके मदत आणि बचावासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच विमान रहिवासी भागात कोसळले. या अपघातामुळे या भागातील अनेक इमारती जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे विमानातील प्रवाशांसोबतच त्या भागातील लोकांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
*या अपघाता मध्ये अनेक जण मृत्यू मुखी पडले. WMO तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*💐💐💐
*⛳ WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन*⛳️

😢
🙏
❤️
18