⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 13, 2025 at 12:26 AM
राजस्थानमधील शिसोदा गावातील मेघराज आणि अजित धाकड या दोन भावंडांनी हे सिद्ध केलं की, दर्जेदार शिक्षण फक्त शहरांपुरतंच मर्यादित नसतं! जिथं त्यांच्या शिक्षणाची पायाभरणी झाली, तीच जुनी सरकारी शाळा त्यांनी आजच्या पिढीसाठी नव्याने उभी केली. स्वतःच्या १५ कोटी रुपयांच्या दानातून त्यांनी 'कंकुबाई-सोहनलाल धाकड शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळा'ला एक अत्याधुनिक, तीन मजली शैक्षणिक संकुल बनवलं. या शाळेत आता आहेत - ४० स्मार्ट क्लासरूम्स, विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, डिजिटल लर्निंग साधनं, समृद्ध ग्रंथालय आणि हिरवळीनं नटलेली सुरक्षित परिसर. या सुविधा पूर्वी फक्त शहरातच मिळत असत. एका गावकऱ्याने अभिमानाने म्हटलं, "आता मुलांना शिकण्यासाठी गावाबाहेर पाठवायची गरज उरलेली नाही. अशा शाळेचं स्वप्र आम्ही कधी पाहिलंच नव्हतं!" शिसोदा गावातून घडलेली ही शिक्षणक्रांतीची कहाणी आपल्याला शिकवते - शाळा म्हणजे फक्त आठवणी नाहीत, तर ती ठिकाणं असतात, जिथून घडलेले विद्यार्थी परत येतात आणि नव्या पिढीसाठी भविष्य घडवतात! *📲 अशाच बातमीच्या इतर नवनवीन अपडेट साठी आपले WMO चे व्हाट्सअप चॅनल फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
Image from ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳: राजस्थानमधील शिसोदा गावातील मेघराज आणि अजित धाकड या दोन भावंडांनी हे स...
👍 🙏 😮 5

Comments