
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
June 13, 2025 at 03:39 AM
आपण कधी कधी समोरच्याला खूप समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो..
पण समजण्यापेक्षा अजूनच गैरसमज वाढायला लागतो..
वाद विवाद वाढायला लागतात..
कारण मुळात समोरच्याला आपल्या मनाची अवस्था कळत नाही..
तो त्याच्या विश्वात असतो..
आपल्याला वाटते त्याला निदान माझ्या भावना कळल्या पाहिजे..
पण त्याला फक्त त्याच्या भावनांचा आदर असतो..
तू तुझे दुःख बाजूला ठेव आणि माझ्या दुःखात साथ दे एवढेच त्याचं मागणं असतं..
तुम्ही ते करतात सुद्धा..
पण कधी जर तुम्ही तुमचे दुःख सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते आवडत नाही.
अशावेळी आपण कसे वागावे आणि काय करावे तेच समजत नाही..
अशा परिस्थितीतमध्ये आपले मन विचार करते की मी कुठे कमी पडतो आहे का?
आपण अजून जास्त बदलण्याचा प्रयत्न करतो पण तेही समोरच्याला कमीच असते..
तेव्हा अशावेळी मनाला एकच सांगायचे की तुम्ही सर्वांना एकाच वेळेला खुश ठेवू शकत नाही..
तुम्ही तुमचे कार्य आनंदाने करा..
जो तुमचा आहे तो तुमच्या सोबत राहील..
ज्याला तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे तो तुम्हालाच दोष देऊन निघून जाईल..
जो निघून गेला तो आपला नव्हता..
जो आपल्या सोबत आहे तो नक्कीच आपला आहे, त्याचा आदर करा..
त्याच्यासाठी जगा..
*माऊलीजी😊*
👍
🙏
❤️
💯
❤
👌
🕉️
🙇♂
🪷
142