Ravindra Phatak
May 27, 2025 at 06:37 AM
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा जयश्री !
पत्नी जयश्रीचा आज वाढदिवस. माझ्या आयुष्यात जयश्रीने आजवर पत्नीसह विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. खरंतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अगदी खंबीरपणे माझ्यासोबत उभे राहून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात अर्धांगिनीची जागा किती महत्वाची असते याची अनुभूती सहवासातून जाणवून दिली.
मी राजकीय जीवनात सक्रीय असतानाही माझ्यापाठी सर्व नाती निभावत असताना कुटूंबीयांसाठी माझी अनुपस्थिती तिने कुठेही जाणवू दिली नाही. तिची साथ आणि सहवास नेहमीच नव्याने कार्य करण्यास प्रवृत्त करत असतो.
नागरिकांमध्ये मिळून मिसळून राहणं, त्यांच्या प्रश्नांना आपले प्रश्न समजणं, या व्यतिरिक्त एका लोकप्रतिनिधीला आपल्या पत्नीकडून दुसरं काहीच नकोय ! याबद्दल तुझे खूप कौतुक वाटते. पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

❤️
😂
🙏
3