
Sanjay Puram ✅
June 13, 2025 at 05:32 PM
दि. १३-०६-२०२५ रोजी तुंबडीकसा येथील रहवासी श्री. विनोदजी लथखोर अरकरा यांच्या घरावरून विद्युत वाहिनीची तार अचानक कोसळल्यामुळे त्यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मी आणि माझा सोबतीस मा. श्री. संजयजी ऊईके (भाजपा तालुका अध्यक्ष, देवरी) व इतर कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी भेट दिली व अरकरा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झालो.
या कठीण प्रसंगी शासनाच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक निधीतून रुपये १५,०००/- इतकी तातडीची आर्थिक मदत त्यांना दिली.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हीच माझी जबाबदारी आहे, आणि ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत राहीन.🙏🏻
आमदार मा. श्री. संजय पुराम
आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र