
मराठी अपडेट्स - Marathi Updates
May 20, 2025 at 01:26 PM
जयंत नारळीकर हे इतके साधे व्यक्ती होते की मी नुकताच पोस्ट ग्रॅज्युएशन करून मुंबईला टी आय एफ आर मध्ये डब्ल्यू एच ओ च्या प्रोजेक्टमध्ये कामाला लागले होते. आमच्याकडे ऑफिसर्स मेस म्हणजे वेस्ट कॅन्टीन आणि बाकी समस्त लोकांसाठी ईस्ट कॅन्टीन किंवा भारतीय खाद्यपदार्थ मिळणार साधं कॅन्टीन अशी दोन पर्याय होते. वेस्ट कॅन्टीन हे फक्त उच्च अधिकाऱ्यांनाच वापरता येत असे तसेच उच्च अधिकारी आपल्या गेस्ट तिकडे घेऊन जाऊ शकत होते पण ईस्ट कॅन्टीनमध्ये कोणीही जाऊ शकत होती.
आम्ही पहिल्यापासून वेस्टर्न तोंडाचे असल्यामुळे नेहमीच वेस्ट कॅन्टीनला जाऊन वेस्टर्न पदार्थ खात असू. तिथे मग कितीही मोठा अधिकारी मोठा वैज्ञानिक किंवा कोणी येऊ प्रत्येक जण एका विशिष्ट रांगेमध्ये उभे राहून बुफेचे जेवण घेत असत. आणि मग रांगेच्या शेवटी एक काउंटर होता तिथे प्लेट मधले पदार्थ बघून जेवणाचं बिल केलं जात असे. जे तेव्हा सर्वसाधारण जास्तीत जास्त नॉनव्हेज जरी खाणारे असतील तरी त्यांचं बिल आठ ते नऊ रुपये होत असे. किंवा अगदी क्वचित प्रसंगी 12 रुपये.
एकदा मी दुपारी लंच साठी म्हणजे लंच दुपारीच असतं पण मी लंच साठी कॅन्टीनला गेले होते आणि एक कोपरा बघून माझी डिश घेऊन जेवायला बसले. मी जेवत होते इतक्यात कोणीतरी मला म्हणाले की
मी तुमच्या शेजारी असलेल्या या खुर्चीत बसू शकतो का?
मी सहज वर पाहिलं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तसा आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे टी आय फार मध्ये स्टीफन हॉकिंग सारखे लोक सुद्धा येऊन गेले होते आणि आम्ही त्यांना अटेंड केलं होतं. पण तरीही जयंत नारळीकर सारखा माणूस आपल्याला चेअर साठी विनंती करतो या धक्क्यात न सावरायला मला काही सेकंद लागले.
आणि मी माझ्या नकळत जेवताना उठून उभे राहिले आणि त्यांना खुर्ची सरकवून दिली म्हणजे ते मॅनर्स असतात , की हो म्हणायचं.
मला थोडक्यात हे सांगायचं आहे की अतिशय साधा निगर्वी आणि कसलाच अहंकार नसलेला अत्यंत हुशार असा हा माणूस मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता. आणि काही मिनिटं त्यांच्यासोबत जेवले होते आणि मग छोटीशी आमची गप्पांची मैफली झाली होती. एखादा प्रथम सायंटिस्ट हा हसमुख चेहऱ्याचा असू शकतो हे जयंत नारळीकर यांच्याकडे पाहिल्यानंतरच विश्वास ठेवू शकले होते.
मी आजपर्यंत कितीतरी लोक मेले अनेक लोकांनी फेसबुक वर त्यांच्या अनेक गोष्टी लिहिल्या पण मी कधीच कोणाला किंवा कोणाबद्दल लिहिलं नव्हतं पण आज मला थांबताच आलं नाही.
-- गौरी
https://www.facebook.com/share/p/1AW7JCCiXd/

❤️
🙏
👌
7