
मराठी अपडेट्स - Marathi Updates
May 26, 2025 at 03:36 AM
नुकत्याच लागलेल्या 10 वी आणि 12वीच्या निकालानंतर मुलांना जहाजातली नोकरी विषयी मार्गदर्शन व्हावे म्हणून खालील पोस्ट शेअर करत आहे, त्याचा योग्य तो लाभ घ्यावा.
ही पोस्ट सगळीकडे शेअर करत गरजू विद्यार्थ्यांपर्यत पोचवा 👍👍👍
आपलाच हितचिंतक
बापा 🙏
********************************************
#जहाजातली_नोकरी_कशी_मिळवायची ⚓🚤
#बापा_बाळासाहेब_पाटोळे 👮👮
इलेक्ट्रो_टेक्नो_ऑफिसर ⚡⚡⚡
मित्र हो, आपण माझ्या प्रत्येक पोस्ट वाचता, लाईक करता आणि अगदी मनमोकळ्यापणाने प्रतिक्रिया ही कळवत असता, त्याबद्दल खूप आभारी आहोत💐💐💐
माझ्या जवळपास प्रत्येक पोस्टवर किमान 5 / 10 तरी कंमेंट मध्ये विचारले जाते की, जहाजात नोकरी मिळेल का? आणि ती कशी मिळते?
याचं उत्तर मी शक्यतो टाळत होतो कारण ते उत्तर सहज सोपे किंवा प्रत्येकाला वयक्तिक पणे कळवणे शक्य नव्हते.
पण समाजाचे कांही तरी देणं लागते आणि माझ्या वाचकांना योग्य ती माहिती मिळावी त्यासाठीच ही आजची अतिखास अशी पोस्ट घेऊन आलोय....यात जी माहिती मी देत आहे त्याचा फायदा आपल्या मराठी बांधवांना व्हावा हाच एकमेव उद्देश आहे.
कारण या क्षेत्रात आता उत्तर भारतीय मुलं, ज्यांनी आयुष्यात कधी समुद्र पाहिलेला ही नसतो, ते आपलं नुसतं नशीब आजमावत नाहीयेत तर त्यांनी हा विभाग जवळपास काबीज केलाय, आणि आपण, ज्यांच्याकडे इतका विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे, ते मात्र या नोकरीपासून वंचित राहिलेत आणि याला कारण म्हणजे योग्य माहिती सहज उपलब्ध नसणे.
मराठी टक्का या विभागात वाढलाच पाहिजे अशी माझी मनोमन ईच्छा आहे आणि याचसाठी हा खटाटोप चालु आहे.
वाचून झाल्यावर ही पोस्ट शक्यतो सगळीकडे पसरावा आणि गरजू व आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती पोचवा.
चला प्रथम जाणून घेऊ, जहाजातील कर्मचारी वृंद.
जहाजात मूळ दोन विभाग असतात
1. #डेक_विभाग
2. #इंजिनिअरिंग_विभाग
या दोन्ही विभागात ऑफिसर सोबत काम करण्यासाठी कामगार वर्ग ही लागतो आणि यात त्यांच्या पदानुसार/ कामानुसार वरील दोन्ही विभागात विभागणी होत असते.
प्रथम आपण पाहू,
#डेक_विभाग_कार्यकारिणी
डेक विभाग म्हणजे हे जहाज चालविण्यासाठी असणारे प्रशिक्षित लोक. याच विभागाचा आणि पूर्ण जहाजाचा ही प्रमुख कप्तान असतो.
यांची पदे खालील प्रमाणे
1.कप्तान
2. चीफ ऑफिसर
3. सेकंड ऑफिसर
4. थर्ड ऑफिसर
5. शिकाऊ ऑफिसर
या विभागाची कांही प्रमुख कामे..
1.जहाज चालविणे
2.कंपनी आणि जहाजात ज्यांचे समान वाहन होत आहे यांच्याशी सतत संपर्क ठेवणे
3. जहाजातील जेवण, आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छता सांभाळणे
4. डेक व डेकवरील मशिनरी व्यवस्थित कार्यान्वित ठेवणे, स्वच्छ तसेच योग्य रित्या सुस्थितीत ठेवणे.
#इंजिनिअरिंग_विभाग_कार्यकारिणी
हा विभाग म्हणजे जहाजाच्या ज्या कांही यंत्रणा, उपकरणे आहेत त्यांची निगा राखणे आणि दुरुस्ती करणे यासाठी असतो. या विभागाचा प्रमुख हा चीफ इंजिनिअर असतो.
या विभागातील पदे खालील प्रमाणे
1.चीफ इंजिनिअर
2. सेकंड इंजिनिअर
3. थर्ड इंजिनिअर
4. फोर्थ इंजिनिअर
5. शिकाऊ इंजिनिअर
या विभागाची कामे म्हणजे मशिनरी व्यवस्थापन आणि दुरुस्ती तसेच दुरुस्ति साठी लागणारे स्पेअर पार्ट यांच्या नोंदी ठेवणे ही असते.
आणि यात आणखी एक वेगळे आणि विशिष्ट असे पद असते ते म्हणजे
#इलेक्ट्रो_टेक्नो_ऑफिसर_ETO
हे पद इंजिनिअरिंग विभागाचा भाग जरी असले तरी जहाजातील इलेकट्रोनिकस आणि विद्युत विभागाची संपूर्ण जबाबदारी या एकट्या ऑफिसर वर असते.
कोणत्याही विभागात आणि कोणत्याही पदावर जाण्यासाठी कांही कोर्सेस करणे महत्वाचे असते त्या कोर्सेसना #pre_sea_training (समुद्रपूर्व शिक्षण) म्हटले जाते.
आता वरील विभागात जाण्यासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागते हे पाहू......
डेक ऑफिसर बनण्यासाठी लागणारी पात्रता बघू.
यासाठी #bsc_nautical हा तीन वर्षाचा कोर्स करावा लागतो, त्यासाठी खालील शिक्षण जरुरी आहे:
1)12 वी सायन्स (Maths असणे अत्यावश्यक)
2) वय मर्यादा 25 वर्षे
3) चष्मा असणे चालत नाही
4) कोर्स कालावधी 3 वर्षे (हॉस्टेल निवास आवश्यक)
5) कोर्स फी 9 ते 15 लाख एकूण.
यानंतर मग एक वर्ष शिकाऊ म्हणून जहाजात ट्रेनिंग आणि त्यानंतर मग थर्ड ऑफिसर आणि जसं जसं अनुभव आणि विभागीय परिक्षा पास होत जाईल तसे प्रमोशन मिळत एकंदरीत पहिल्या जहाजपासून 10 ते 13 वर्षात कप्तान बनता येते.
आता इंजिनिअर ऑफिसर बनण्यासाठी लागणारी पात्रता बघू,
अभ्यासक्रमाचे नाव
#btech_marine_engineering
1)12 वी सायन्स (Physics, Chem and Maths असणे अत्यावश्यक)
2) वय मर्यादा 25 वर्षे
3) चष्मा असल्यास चालते
4) कोर्स कालावधी 4 वर्षे (हॉस्टेल निवास आवश्यक)
5) कोर्स फी अंदाजे 10 ते 15 लाख एकूण.
यानंतर मग एक वर्ष शिकाऊ इंजिनिअर म्हणून जहाजात शिक्षण आणि त्यानंतर मग फोर्थ इंजिनिअर ऑफिसर आणि जसं जसं अनुभव आणि विभागीय परिक्षा पास होत जाईल तसे प्रमोशन मिळत पहिल्या जहाजानंतर 10 ते 12 वर्षात चीफ इंजिनिअर ऑफिसर बनता येते.
वरील दोन्ही विभागासाठी 12 वी मध्ये PCM_असणे_अत्यावश्यक आहे.
दरवर्षी 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कांहीच दिवसांत बातमीपत्रांमध्ये #imu_cet_marine {IMU - Indian Maritime University मार्फत} अशी जाहिरात प्रकाशित केली जाते, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार आपले नाव नोंद करून IMU CET परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेतील मार्कानुसार आपल्याला वरील शिक्षणाचे कॉलेज मिळते आणि मग आपण विभाग निवडू शकतो.
ही जहाजी कॉलेज सध्या फक्त मोठमोठ्या शहरात जसे की पुणे, मुंबई , कोचीन, विशाखापट्टणम, कलकत्ता, मद्रास अश्याच ठिकाणी आहेत आणि इथं आपल्या IMU CET रँक नुसार प्रवेश दिला जातो.
ही परीक्षा सहसा दरवर्षी जुलै मध्ये होत असते (सध्या कोरोनामुळे या परिक्षा चालू आहेत आणि किंवा नाही हे सांगणे कठीण आहे)
आता बघू
#इलेक्ट्रो_टेक्नो_ऑफिसर कसे बनायचे?
इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा अथवा पदवी पास असणारे यासाठी पात्र असतात
कोर्स कालावधी : 4 महिने
कोर्स शुल्क : 2 ते 4 लाख रुपये
आणि कोर्सनंतर या विभागाची लेखी व तोंडी परीक्षा पास झाल्यानंतर,किमान 6 महिने (ट्रेनी) शिकाऊ म्हणून जहाजात काम व त्यांनतर मुख्य इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर म्हणून रुजू करून घेतात.
ETO या पदावरून पुढं पदोन्नती शक्य नसते, या पदाच्या वरती किंवा खालती कोणतीही पोस्ट नसते हे विशेष लक्षात घ्यावे.
आता शेवटी बघू कामगार म्हणजेच क्रु वर्गाची माहिती.
कामगार वर्ग म्हणजे
क्रु_विभाग
याला म्हणतात
#gp_rating (General_Purpose_Rating)
यामध्ये पुन्हा वरील प्रमाणेच दोन विभाग
डेक विभाग
इंजिन विभाग
यातच जेवण विभाग म्हणजेच Catering Department चे ही कोर्स असतात.
आता या कोर्सविषयी पात्रता पाहू
1) 10 वी पास
2) वय किमान 18 ते कमाल 25 वर्षे फक्त
3) चषमा नसावा
4) कोर्स कालावधी 6 महिने
5) खर्च 1.5 ते 3 लाख एकूण
कोणत्या विभागात काम करायचे आहे हे कोर्स ऍडमिशन घेताना ठरवले जाते.
वरील पैकी कोणताही कोर्स ज्याला PreSea Training म्हणतात ते करून आपण डेक व इंजिन विभागात ऑफिसर बणू अथवा कामगार बणू, पण पुढील उल्लेख केलेले कोर्स करणे हे प्रत्येक जहाजी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक असते.
त्या कोर्स चे नाव आहे
#stcw_courses
हा कोर्स प्रत्येकाला जरुरी आहे कारण यात
🔸आग_व्यवस्थापन, (Fire Fighting)
🔸मेडिकल_परिस्थिती_हाताळणी, (Medical Course)
🔸पाण्यात_बुडताना_जीव कसा वाचवला जातो (Sea Survival technic) 🔸जहाजात_असताना_इतरांसोबत एक कुटुंब म्हणून कसे वागायचे आणि शेवटी (PSSR)
🔸जहाजावर_दहशतवादी किवा (Safety and Severity course)
समुद्री_चाच्यांनी_हल्ला केला तर कसे स्वतःला वाचवायचे हे विषय शिकवले जातात.
या सगळ्या कोर्स चा कालावधी 15 ते 20 दिवस असतो आणि खर्च जवळपास 25 ते 30 हजार असा येतो.
हे कोर्स प्रत्येक नवीन असो वा जुने जहाजी कर्मचारी, प्रत्येक कर्मचाऱ्यांना दर पाच वर्षांनी हे कोर्स पुन्हा करावे लागतात कारण या कोर्स ची सर्टिफिकेट ही फक्त 5 वर्षे वैध असतात.
🔴🔴🔴आता एक अत्यन्त महत्वाची माहिती सांगत आहे ती नेहमी लक्षात ठेवा.
वरील माहिती लक्षात नाही आली तरी चालेल पण खालील माहिती विसरलात तर आपले आर्थिक नुकसान/ लुबाडणूक कोणीही थांबवू शकणार नाही.
डेक विभाग आणि इंजिनिअर विभाग यातील ऑफिसर अथवा रेटिंग असा कोणताही कोर्स तुम्हाला जहाजात नोकरी मिळवण्यास पात्र बनवतो....
आणि...
STCW कोर्सेस तुम्हाला स्वतःचा आणि मग इतरांचा जीव / मालमत्ता हानी कसे टाळता येईल हे शिकवतात.
त्यामुळे दोन्ही करणे जरुरी आहे.
पण दुर्दैवाने.... कांही लालची लोक सामान्य लोकांना अर्धवट माहिती देत फक्त STCW कोर्से करवून घेतात आणि जहाजात नोकरी लावतो म्हणून या कोर्स फी व्यतिरिक्त लाख दोन लाख पैसे काढून घेऊन पलायन करत फसवतात.🔴🔴🔴
⚠️⚠️विशेष_सूचना :⚠️⚠️
⛔ फक्त STCW कोर्स करून जहाजात नोकरी मिळणे अशक्य आहे.
⛔ वरील शिक्षणासाठी कोणतेही आरक्षण, सवलत अथवा शुल्क माफी असले कांहीही प्रकार नसतात.
⛔ वरील कोणताही कोर्स केल्यानंतर लगेच नोकरी लागत नसते, इथं ही भयंकर स्ट्रगल आहे, कोणाच्या तरी ओळखीने नोकरी मिळत नाही स्वतःच कंपन्यांची दारे ठोठावी लागतात.
(IMU CET मध्ये राष्ट्रीय पातळीवर आपण रँक मिळवली असल्यास कंपनी स्वतः तुम्हाला निवडते आणि ट्रेनिंग साठी जबाबदारी घेते, सोबत स्टायपेंड म्हणून कांही रक्कम ही देते)
⛔ ताबडतोब नोकरी मिळेल किंवा घातलेला पैसा झटक्यात कमवू असा विचार कटणार्यांनी इकडं आपलं नशीब अजिबात अजमावू नये हा प्रामाणिक सल्ला आहे.
याव्यतिरिक्त खालील कागदपत्रे ही जहाजात जॉईन होण्यासाठी जरुरी असतात
#पासपोर्ट (स्वतः बनवावा लागतो)
#भारतीय_CDC (ही पुस्तिका भारत सरकार द्वारा वरील कोणताही PreSea कोर्स केल्यानंतर अर्ज मागवून दिली जाते)
#मेडिकल_प्रमाणपत्र
#व्हिसा
(मेडिकल आणि व्हिसा याची व्यवस्था ज्या कंपनीत जॉईन व्हाल ती करते)
वरील करिअर मध्ये मुलीही सहभागी होऊ शकतात, होत ही आहेत.
पण शारीरिक जडणघडण आणि लग्न व मुलंबाळं झाल्यानंतर होणाऱ्या अडचणी या अश्या नोकरीत स्त्रियांना त्रासदायक ठरतात.
जाता जाता आणखी एक महत्त्वाचे...
मी कोणालाही जहाजात नोकरी लावू शकत नाही.....पण
जहाजात नोकरी कशी मिळवायची हे मी खात्रीने सांगू शकतो 💞💞💞💞
या पोस्टवर उलट सुलट प्रश्न विचारू नयेत, कारण प्रत्येकाला उत्तर देणे मला शक्य होणार नाहीय, माझ्यापरीने मी मला माहित असलेली पूर्ण माहिती इथं देण्याचा प्रयत्न केला आहे , यापेक्षा जास्ती माहिती हवी असल्यास मी घरी (सुट्टीवर) असताना यावर एक तासाचा कार्यक्रम वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेज मध्ये निःशुल्क घेत असतो आणि त्याची माहिती FB वर कळवत असतो तिथं यावे म्हणजे समोरासमोर चर्चा करता येऊ शकते. किंवा आपण ही आपल्या शहरात माझा कार्यक्रम आयोजित करू शकता... ही माहिती प्रत्यक्ष देण्यास मला जास्ती आनंद होतो 💝💝💝
आपलाच एक मराठी बंधू
बापा - बाळासाहेब पाटोळे
इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर
टोकियो, जपान
👍
❤️
9