Dindoripranit Creation
June 14, 2025 at 07:12 AM
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏* *💯🌹अत्यंत प्रभावी श्री हनुमंताची सेवा🌹💯* *👉दर शनिवारी किंवा आपल्या प्रश्नाच्या तिव्रतेप्रमाणे स्वरुपाप्रमाणे दररोज करावयाची सेवा.* *👉 या दिंडोरीप्रणीत मार्गातील नित्यसेवा ग्रंथातील मारोती स्तोत्र , हनुमान वडवांनल स्तोत्र ,हनुमदबिसा स्तोत्र व लांगुलास्त्र शत्रूंजय स्तोत्र रामरक्षास्तोत्र हे अनेक प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून उपयोगी आहेत.* *👉 उदा. परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटणे कोर्ट कचेरीच्या कामात यश , कर्ज निवारण, बाधा, खोटा आरोप येऊन आळ घेऊन तुरुंवास झाला असेल तर ,घरात भाऊबंदकीचा त्रास होऊन सतत वाद होत असतील तर , घरात एकोपा रहावा म्हणून व वादळ वारे थांबण्यासाठी, विद्याभ्यासात यश मिळण्यासाठी, रामबाण सेवा रुपी औषध म्हणजे या सर्व स्तोत्राचे पठण मनन व चिंतन करणे होय.* *👉विधिवत शास्त्रोक्त संकल्प सोडून जर ही सेवा केली तर चिरंजीव देवता असलेले श्री हनुमंत तात्काळ पावतात व हाकेस धावून येतात हे अनुभवसिद्ध सत्य आहे असे आपले प.पु. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आपल्या हितगुजा मधून वारंवार सांगत असतात.* *👉 ही हनुमंताची सेवा सूरू करण्याच्या अगोदर जवळच्या मारोती मंदिरात शनीवारी हळद घालून बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या कणकेचा दिवा लावुन मारोतीस संकल्पित कार्य पूर्ण होण्याविषयी क्षमा याचना प्रार्थना विनंती करावी. जमल्यास प्रत्येक शनीवारी हा दिवा लावला तरी काही हरकत नाही.*
🙏 ❤️ 👍 😢 28

Comments