Dindoripranit Creation
June 18, 2025 at 11:57 AM
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏* *💯🌹पितृदोष म्हणजे नेमकं काय ?🌹💯* *👉आपल्या कुटुंबात परिवारात कोणीतरी अपघाती आकस्मात अपमृत्यू, जळून, पाण्यात पडून, सर्पदंशाने मृत्यू पावलेले असतात किंवा काही कारणाने पितरांना सद्गती मिळत नाही अशावेळी ती आत्मा भटकत असते, खूप त्रास सहन करत असते व त्या आत्म्याचे दोष त्या कुटुंबाला लागत असतात.* *👉बरेचदा हे पितर खूप त्रस्त असल्यामुळे ते त्यांचा स्वतःचा वंश संपवण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देत नाहीत व कुठलीच शुभकार्य होऊ देत नाही.* *👉यामुळे बरेचसे प्रश्न कुटुंबाला सामोरे जावे लागते ज्यात मुख्य म्हणजे - संतती न होन, विवाह न जमणं , जमलेले विवाह मोडणे , पती-पत्नी मधील वाद, घरात नित्य आजारपण, व्यवसायात आर्थिक तोटे इत्यादी. अशा वेळी पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला पंचमहायज्ञ ची अगदी सोपी सेवा दिली आहे. तेव्हा प्रत्येकाने पंचमहायज्ञ करणं खूप महत्त्वाचा आहे.* 👉तसेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला पितृ दोषा वरील शेवटचा उपाय म्हणजे - *भागवत - जो कोणी भागवत ग्रंथाचे पारायण करेल त्याचा पिढ्यान् पिढ्यांचा उद्धार होईल, त्यांच्या पितरांना सद्गती लाभेल व पितरांचा मोठा आशीर्वाद त्या कुटुंबीयांन प्राप्त होईल* 👉प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या भागवत करणे शक्य नसते, अशा वेळी प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी *संक्षिप्त भागवत आपल्या हातात दिले* व संक्षिप्त भागवत वाचणाऱ्याला अगदी तेच पुण्य आहे जे भागवत वाचण्यात आहे, पूर्ण भागवत संक्षिप्त करणे ही ताकद आणि अधिकार फक्त आणि फक्त परब्रह्माच्या हातात असते, आणि परम पूज्य गुरुमाऊली स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणून आपल्यासाठी हा भागवत खुला केला आहे. *तरी आपण सर्वांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भागवत पारायण करावे व श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह संपूर्ण भागवत सेवा करावी, व अनुभूती घ्यावी* https://www.instagram.com/dindoripranit_creation/profilecard/?igsh=MW56MnhmbGhhdHZxaA== *‼️श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीं‼️*
🙏 ❤️ 👍 20

Comments