Dindoripranit Creation
June 18, 2025 at 02:56 PM
*स्वामी तारी त्याला कोण मारी ह्याची खरी प्रचिती आली* *तूच कर्ता आणि तूच करविता* *स्वामी माझा तू सोबती तू सारथी* .......🙏😊🙏........ परब्रम्ह भगवान श्री स्वामी महाराज तसेच मोरे दादा आणि गुरुमाऊली यांना कोटी कोटी प्रणाम 🙏 आपल्या कृपेने आमच्यावरचे भयानक संकट टळले मी ज्योती जाधव पुणे कोथरूड केंद्र माझा मुलगा शेखर जाधव याची मुलगी प्रियांका जाधव ती गेली गेली चार वर्ष एअर इंडिया मध्ये एअर होस्टेस म्हणून जॉब करत आहे. ती दुबईला जाऊन आली. दोन दिवस सुट्टी होती म्हणून पुण्यात आली. तिला पुन्हा गुरुवारी लंडनला जायचं होतं त्यासाठी बुधवारी मुंबईला जाणारी होती. पण अचानक तिला ताप आला आणि घसा पण दुखायला लागला म्हणून सुनबाईंनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून औषधे दिली आणि सांगितले हिला विश्रांतीची गरज आहे ताप आहे तसेच घशालाही सुज आहे. त्यामुळे तिला थंड वातावरणात पाठवू नका आणि विश्रांती घेण्यासाठी औषधे दिली त्यामुळे ती मुंबईला गेली नाही तिच्या सरांना कळविले त्याच सकाळी मी देवपूजा करून आरती करत असताना स्वामिनी मला दृष्टांत दिला भगवा अंगरखा लुंगी भगवी हातात कमंडलू काखेत झोळी असे दर्शन दिले मी रडायला लागले स्वामी आज का प्रकट झाला काय संकेत आहे हा मला ? माझे डोळे पाणावले अश्रू अनावर झाले मी त्यांच्या आठवणीत थोडा वेळ रडले आणि नेहमीप्रमाणे स्वामींच्या केंद्रात गेली माझी नित्यसेवा केली पण मला त्यांचे ते भगवे रूप सारखे आठवत होते आनंदाने घरी आले दोन-तीन च्या सुमारास एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबाद मध्ये कोसळले आणि ह्यातील सर्व प्रवासी जळाले अशी बातमी पाहून डोके सुन्न झाले झाले. हा अपघात पाहूनच मी विचार करायला लागले असे काय घडले? एका क्षणात होत्याचे नव्हते झाले! तिच्या त्या विमानातील सर्व मैत्रिणी देवा घरी गेल्या काय वेळ आली. माझ्या स्वामींनी माझ्या नातीला थांबवले भक्तांवर दया केली स्वामी खरच तुमची लीला अप्रंपार आहे आमच्या जाधव कुटुंबाला तुम्ही जीवनदान दिले आपल्या भक्ताचे रक्षण केले. *धन्य स्वामी, धन्य मोरे दादा आणि धन्य ते गुरु माऊली आपणाला कोटी कोटी प्रणाम....🙏* *आपली सेवेकरी* ज्योती जाधव(कोथरूड केंद्र) https://www.instagram.com/reel/DIP3T6yBseM/?igsh=MTgxeXAxajQ2bnJqeA==
🙏 ❤️ 👍 🙇‍♂ 45

Comments