
SwaRa "पुस्तक परिचय"
May 22, 2025 at 05:42 PM
*कथा अज्ञात स्वातंत्र्य सौनिकांच्या*
प्रा. डॉ. शिवाजी मस्के
मिहाना पब्लिकेशन्स
192 पाने
किंमत 300/-
.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांसोबतच सामान्य नागरिकांनी आपले बलिदान दिले आहे.
अनेक ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व समर्पणातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. हा बलिदानाचा, त्यागाचा इतिहास विस्मरणात जाऊ नये. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांना सांगितला जावा. थोर व्यक्ती असतील तर गावागावांत त्यांचे पुतळे उभारले जातात, पण थोरांप्रमाणेच सामान्य माणसेही बलिदान देत असतात त्यांचे बलिदान व समर्पण लोकांना कळले पाहिजे. अशा या अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे पुतळे उभारले जात नाहीत, त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी होत नाही, पण त्यांचे योगदान थोरांपेक्षाही श्रेष्ठ असते. गंगा विशाल बनते ती तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांमुळे. ज्यांनी बलिदान दिले त्यांना आठवणे, त्यांच्या त्यागाचं स्मरण करणं ही एक राष्ट्रसेवाच आहे.
.
तुमची आवडती पुस्तके घरपोच मिळवनेसाठी
तुम्ही व्हाट्सअँप द्वारे देखील संपर्क करु शकता. +91 9579824817
🙂
*स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोेअर.*
पुस्तके रजिस्टर पोस्ट ने घरपोच मिळतील...
