
SwaRa "पुस्तक परिचय"
June 8, 2025 at 01:53 AM
*पाऊस हाच कादंबरीचा नायक असणारी ही मराठीतली एकमेव कादंबरी.*
*पावसाची विविध रूपं इथे सहज विकसित होत जातात. शेतकरी आणि पाऊस, खेडं आणि पाऊस यांचे अनोखे नातेबंध या कादंबरीत उलगडतात.
या कादंबरीत पाऊस एका वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो. झडीचा पाऊस येण्याआधी पावसाची आतुरतेने वाट पाहणारा गाव आणि झडीचा पाऊस सुरू झाल्यानंतर बेहाल झालेलं गाव या कादंबरीत चित्रित झालेलं आहे. या झडीत गाव, माणूस, शेती, वृक्षवल्ली, जलचर, पाळीव प्राणी हे सारेच हतबल, अगतिक होऊन जातात आणि त्यांची दाणादाण उडून जाते. पाण्याचे, पावसाचे आणि माणसाचे नवे ताणतणावात्मक, उद्ध्वस्ततेकडे झुकलेले नातेबंध ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते.*
*पावसाने हाहाकार मांडल्यानंतर जीव गमावणारे, जीव वाचवण्यासाठी धडपडणारे, जगण्याची तीव्र आकांक्षा असणारे या सर्व परिस्थितीत कसे बदलतात, वर्तन करतात याचे सूचन कादंबरीच्या तपशिलातून कृष्णात खोत समर्थपणे करतात.*
*महापुरातील चौमाळ पाण्यासारखी कृष्णात खोत यांची भाषा या कादंबरीत वाचणाऱ्याला खिळवून ठेवतेच पण त्याहीपेक्षा अधिक घन मानसिकतेतून द्रव मानसिकतेत आणून वादळी व्हायला भाग पाडते*
*झड-झिंबड ही कृष्णात खोत लिखित कादंबरी खरेदी करण्यासाठी कृपया पुढील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.*
Swara Books 9579824817
