
SwaRa "पुस्तक परिचय"
June 10, 2025 at 03:18 PM
*एकाला जरी कोयत्यानं मारला असता तर तिची दहशत बसून तिला शांत जगता आलं असतं का.?*
*असे अनेक प्रश्न मनाला पडत होते.*
एकूण अभिप्राय - ३८७७
खालील अभिप्राय - ११९१
आवृत्ती १९ वी
किंमत ४५०
नमस्कार देवा भाऊ 🙏
एक फेब्रुवारीला पुस्तक मिळालं. पण कामाच्या गडबडीत पुस्तक वाचायला वेळ मिळत नव्हता.
त्यानंतर पंधरा दिवस आजारपणात गेले. आता वाचू म्हणता बहिणीने वाचायला घेतलं.
तिचं वाचून झाल्यावर काल एक मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास पुस्तक हातात घेतलं.
घरातली कामं, पक्षकारांचे फोन घेत असं सगळं बघत कालचा पूर्ण दिवस आणि पुन्हा पहाटे साडे चारपर्यंत सगळं वाचून झालं.
पुस्तक वाचता वाचता पारूला त्रास देणाऱ्या, तिच्या आयुष्याचं मातेरं करणाऱ्या रंग्यापासून, ते तिची पहिली सासू, नणंद, नवरा, दुसऱ्या आणि लग्नानंतर त्रास देणारी भावकी, तिच्यावर हात टाकणारा मुकादम आणि इतर लोकांना मनातल्या मनात शिव्या देऊन झाल्या.
पुरुषसत्ताक समाजाने एका बाईच्या आयुष्याची एवढी वाट लावली की जगणं आणि मरण दोन्ही सारखंच झालं. किती ती हतबलता, अगतिकता.... दुसऱ्या नवऱ्याची चार पोरं सोडून येताना आणि त्यानंतर किती वेदना झाल्या असतील....
त्या जमिनीचा विषय सोडून दिला असता तर ती मुलांना सोबत घेऊन तिथून निघून आली असती का.... तिच्यानंतर ती कशी जगली असतील...
त्या पोरींना या हरामखोर समाजानं काही केलं तर नसेल ना....
भावकीतल्या एकाला जरी जवळच्या कोयत्यानं मारला असता तर तिची दहशत बसून तिला शांत जगता आलं असतं का हे आणि असे अनेक प्रश्न रात्रभर डोक्यात घोळत होते. पारूला तिच्या जातवाल्यानी नाही पण दुसऱ्या जातीच्या लोकांनी तरी आधार दिला नाहीतर तिचं कसं झालं असतं. माहेर मागं टाकून बाहेर पडल्यावर तिला आधार देणाऱ्यांनी माणुसकीला जात धर्म नसतो हेच सिद्ध केलं.
सणासुदीला पुरणपोळी मिळाली नाही तर दुसऱ्याकडून पोळी मागून आणणारी आई बघून डोळ्यात पाणी आलं. पोराने आईच्या कष्टाची जाणीव ठेवली हे एका आईसाठी खूप महत्वाचं आहे. शिक्षणाची ओढ, त्यासाठी दोघांची धडपड आणि शिक्षकांचा हातभार...
सलाम आहे.
माझ्या मनात अनुत्तरित असलेल्या प्रश्नांची उत्तरं कदाचित पुढच्या कादंबरीत मिळतील...
वाट पाहतेय दुसऱ्या भागाची.
एक प्रत राखून ठेवा.
तुमच्या हातून असंच दर्जेदार लिखाण होऊ दे,
उत्तरोत्तर प्रगती होऊ दे हीच देवळीत ठेवलेल्या पांडुरंगाकडे प्रार्थना.
ऍडव्होकेट स्वाती कांबळे
पुस्तकासाठी- WhatsApp - 9579824817
#viralreelsfacebook #सगळंउलथवूनटाकलंपाहिजे #एकभाकरतीनचुली #reelschallenge #devazinjad #देवाझिंजाड #अभिप्राय #readers #books #पुस्तक #readerscommunity #booksonline #bookreview #bestbooks #bestmarathibook #मराठीभाषा #marathi #कादंबरी #साहित्य #ग्रामीण #पारू #बबू #फेसबुक
