
SwaRa "पुस्तक परिचय"
June 13, 2025 at 03:36 PM
थोर माणसं एकमेकांना पत्र लिहितात..rather कोणे एके काळी जेव्हा लिहीत असत..तेव्हा काय लिहीत असतील ते.. ' आहे मनोहर तरी ' मध्ये सुनीताताई जी. ए. नचा उल्लेख करतात, कुमार गंधर्वांसोबतच्या गप्पांचा, चर्चांचा संदर्भ देतात तेव्हा..haaaa असं झालेलं...
हे पुस्तक बघून पहिली reaction तीच झाली..काय लिहीत असतील हे विचारवंत एकमेकांना..
१९०९ ते १९१० म्हणजे एक वर्ष जेमतेम दोघांनी पत्रव्यवहार केला...गांधीजी होते ३९ आणि टॉल्स्टॉय ७९ वर्षांचे..८ पत्रं लिहिली एकमेकांना.. रशियन भाषेतून थेट हिंदीत अनुवादित केलेली ही पत्रं..
टॉलस्टॉय ने ' हिंदुस्तानी के नाम पत्र ' लिहिलं आहे. हा एक लेखच आहे. गांधीजींनी त्यावर त्यांना उत्तर लिहिताना भारताची गुलामीत असण्याची कारणं, साऊथ आफ्रिकेमधली परिस्थिती, Indian Homerule या पुस्तकाबद्दल, सत्याग्रह या संकल्पनेबद्दल लिहिलं आहे.
#dailybook
#anjiebooks
#booklover
