Krushik App
Krushik App
May 23, 2025 at 04:11 AM
*पीकविम्याची भरपाई ३७७७ कोटींवर; शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 23-May-25 सौजन्य : अॅग्रोवन ➖➖➖➖➖➖➖ खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. एकूण चार ट्रीगरमधून ही भरपाई मंजूर झाली. मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार आहेत. लवकरच ही भरपाई देखील खात्यात जमा होईल अशी माहीती कृषी विभागाने दिली.खरिप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना एकूण ४ ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. यापैकी राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ताच विमा कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई खात्यात जमा होत आहे. राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळेल.चार ट्रीगरमधून शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील विमा भरपाईची स्थिती ३ हजार २७९ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर आणखी ४९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. ➖➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱 ‪‪‪‪‪https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US *लातूर विभागातील विमा भरपाईचे चित्र* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक परभणी…४२९.८५…४०३.७७…२६.०७ नांदेड…३६१.४४…२५४.२७…१०७.१६ धाराशीव…२१९.९२…२१८.०२…१.९० लातूर…२४६.६१…२२७.४०…१९.२० हिंगोली…१७८.१९…१७२.७५…५.४३ *छत्रपती संभाजीनगर विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक बीड…२८२.६२…२८२.५३…०.९ जालना…२६३.४०…१६२.४६…१००.९४ अमरावती विभागातील विमा भरपाईची परिस्थिती जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक बुलडाणा…३१८.५६…३१६.१४…२.४२ अमरावती…६१.७८…५०.४६…११.३१ अकोला…९०.४९…७९.५३…१०.९५ *नागपूर विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक वर्धा…१२६.९१…१२५.५७…१.३४ नागपूर…६६.५९...६३.७३…२.८५ भंडारा…०.५२…०.४८…०.४ गोंदीया…०.३४…०.३४…०.३३ चंद्रपूर…४२.६९…३५.९४…६.७४ गडचिरोली…५.४७…३.०६…२.४० वाशिम…८८.४५…८८.४५…० यवतमाळ…१७५.८७…१५२.६९…२३.१८ छत्रपती संभाजीनगर…१२९.७९…१२९.२६…०.५२ नाशिक विभागातील विमा भरपाईची स्थिती जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक नाशिक…११५…७९…३६ धुळे…२८.७६…२२.७३…६.०३ नंदुरबार…२३.८६…२०.८७…३ जळगाव…५५.३३…५१.६८…३.६४ *पुणे विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक अहिल्यानगर…१७१.३६…१४४.१४…२७.२१ पुणे…३.७६…३.३७…०.३८ सोलापूर…२५७.४०…१७४.२२…८३.१८ *कोल्हापूर विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक सातारा…४.४०…०.५१…३.८८ सांगली…७.३७…७.३३…०.४ कोल्हापूर…१०.५९…८.०१…२.५८

Comments