Krushik App
Krushik App
May 26, 2025 at 04:06 AM
*मॉन्सून कोकणात दाखल* ⛈️🌧️⛈️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 26-May-25 सौजन्य : अॅग्रोवन ➖➖➖➖➖➖➖ मे महिन्यात सुरू असलेल्या विक्रमी पावसानंतर नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) महाराष्ट्रात दणक्यात आगमन झाले आहे. रविवारी मॉन्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. विशेष म्हणजे १९९० नंतर प्रथमच मॉन्सून इतक्या वेगाने महाराष्ट्रात दाखल झाला आहे. १९९० मध्ये २० मे रोजी मॉन्सून तळकोकणात दाखल झाला होता.केरळसह, कर्नाटक किनारपट्टीवर आठवडाभर आधीच दाखल झालेला मॉन्सून यंदा ११ दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात पोहोचला आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्राने चाल दिल्याने मॉन्सून प्रवाहाचा वेग अधिक बळकट झाला आहे.रविवारी (ता. २५) मॉन्सूनने कर्नाटकच्या आणखी काही भागासह, संपूर्ण गोवा आणि तळकोकणात मजल मारली आहे. तर पूर्वोत्तर भारतातही मॉन्सूनने वाटचाल सुरूच ठेवली असून, मिझोराम, मणिपूर आणि नागालॅण्ड राज्यात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.यंदा अंदमान बेटांसह देशात मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. शनिवारी (ता. २४) मॉन्सूनने केरळमध्ये धडक दिली होती. रविवारी (ता. २५) देवगड, बेळगावी, हवेरी, मंड्या, धर्मपूरी, चेन्नई तसेच ईशान्य भारतातील कोहिमा पर्यंत मॉन्सून पोचला आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडूसह कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग आणि ईशान्य भारताच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. *१९९० मध्ये सर्वांत लवकर आगमन* १९६० पासूनच्या नोंदीनुसार मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाच्या वेळा लक्षात घेता १९९० मध्ये मॉन्सून सर्वाधिक लवकर म्हणजेच २० मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यापूर्वी १९६२ मध्ये, तसेच यंदा मॉन्सून २५ मे रोजी महाराष्ट्रात धडकला आहे. १९७० मध्ये २९ मे रोजी तर १९७१ आणि २००६ मध्ये ३१ मे रोजी मॉन्सून महाराष्ट्राच्या भूमीवर पोचला होता. मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वेगवान आगमन ➖➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱 ‪‪‪‪‪‪‪https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US *वर्ष--तारीख* १९९०---२० मे १९६२---२५ मे २०२५---२५ मे १९७०---२९ मे १९७१---३१ मे २००६---३१ मे
👍 1

Comments