Krushik App
Krushik App
May 30, 2025 at 10:57 AM
*शेतीत एआयचा वापर करा.! आमच्यासोबत तुम्हीही तंत्रज्ञानाची कास धरा, प्रगत शेतकऱ्यांचे आवाहन* सौजन्य:- सकाळ बारामती : बदलत्या काळात लहरी हवामानाचा फटका सहन करण्यापेक्षा तंत्रज्ञानाची मदत घेऊन कमी खर्चात अधिक उत्पादन व उत्पन्न देणारी शेती सहज शक्य आहे, आम्ही ही कास धरली आहे, तुम्हीही आमच्यासोबत या मोहिमेमध्ये सहभागी व्हा....असे आवाहन काही प्रगतीशील शेतक-यांनीच केले आहे. शेतीतील कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर बारामतीच्या अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नातून प्रत्यक्ष शिवारात यशस्वी ठरला आहे. अनेक शेतक-यांच्या शेतात या तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल केला आहे. सरकार, साखर कारखाने यांच्याकडून या साठी प्रयत्न सुरुच आहेत, सहकारी बँकांनीही यात मदतीचा हात पुढे केला आहे, त्याबरोबरच आता शेतक-यांनी स्वताः या तंत्रज्ञानाचा वापर तातडीने सुरु करायला हवा, हे सहकारी शेतकरीच आता सांगू लागले आहेत. सहकारी साखर कारखानादारी शेतक-यांच्याच सामूहिक प्रयत्नातून उभी राहिली आहे, इथेही शेतक-यांनी एकत्र येण्याची गरज आहे. 💬आष्टा येथील डॉ. संजीव माने यांनी एआय तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या शेतात केला आहे. ते म्हणतात, कमी पाण्यात, योग्य खतात, जमिनीची सुपीकता टिकवून कमी दिवसात आणि म्हणजेच कमी खर्चात अपेक्षित उत्पादन मिळवणे म्हणजे एआय तंत्र...मी पहिल्या दिवसापासून या प्रयोगाचा साक्षीदार आहे. अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने मेसेज मोबाईलवर येतात, त्या नुसार आपण फक्त कार्यवाही करायची असते. पाण्याची उत्तम बचत झाली, रोग किडीची माहिती अगोदरच समजू लागली, उपाययोजनाही लगेचच हजर होत्या. उपग्रहाच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती मोबाईलवरच सतत येत राहते, त्याने लगेचच सुधारणा करता येतात. कारखाना, बँका किंवा सरकार आपल्या परिने यात सहकार्य करेलच, त्या सोबतच शेतक-यांनीच आता हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. (संजीव माने मोबाईल- 94043 67518) 💬बारामती तालुक्यातील को-हाळे येथील आदित्य यशवंत भगत म्हणतात, या तंत्रामुळे उसाच्या शेतीत पाण्याची किमान 45 टक्के बचत झाली, हवामानाचा अचूक अंदाज मिळत असल्याने उपाययोजना करता येतात, रोग किडीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते, सॉईल सेन्सरमुळे योग्य खते ड्रीपद्वारे पिकांना देता येतात, उपग्रहाच्या मदतीने पाणी, खत मात्रा किती हवी याचा अचूक अंदाज येतो, माझ्या उत्पन्नात या मुळे वाढ होईल शिवाय उसाचे उत्पादनातही चाळीस टक्क्यांहून अधिक वाढेल, यात शंका नाही. बदलते तंत्रज्ञान प्रत्येका��े वापरायला हवे. शेतक-यांसाठी ही संधी आहे, त्याचा फायदा प्रत्येक शेतक-याने करुन घ्यायलाच हवा. ( आदित्य भगत मोबाईल- 98606 12299) 🔹या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हायला हवे आजमितीस उसासोबतच भात, द्राक्ष व डाळींब या पिकांमध्येही एआय तंत्रज्ञान वापरुन कमी खर्चा अधिक उत्पादन व उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट करत आहे, दीड हजारांवर शेतकरी यात प्रत्यक्ष सहभागी असून त्यांच्या शिवारात हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. शेतक-यांकडूनच आता नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हायला हवा हा संदेश इतर शेतक-यांना दिला जात आहे, ही बाब महत्वाची आहे. 🔹शंभर एकर जमीन मालकांनी एकत्र यायला हवे परदेशाशी तुलना करता आत्ता अत्यंत माफक खर्चात हे तंत्रज्ञान आपल्या शेतात केव्हीके बारामतीने उपलब्ध करुन आहे. 24 महिन्याच्या पीक पध्दतीने जादाची दोन पिके घेता येतील, हार्डवेअरचा खर्च एकदाच असेल व तो पाच वर्षांसाठी असेल, इतर दरवर्षी खर्च एकरी 4 ते 5 हजार असेल, वाढलेल्या उत्पन्नातून खत व पाणी बचत, उत्पादन वाढीमुळे एक वर्षात केलेली गुंतवणूक सहज भरून निघते. केलेली गुंतवणूक कमी व मिळणारा फायदा अधिक असे याचे गणित आहे. शंभर एकर जमीन मालकांनी एकत्र आल्यास अधिक प्रभावीपणे या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे शक्य होते. या बाबत अधिक माहितीसाठी अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या तज्ज्ञांशी या क्रमांकावर संपर्क साधावा- डॉ. विवेक भोईटे- 77200 89177, तुषार जाधव- 93092 45646

Comments