
Krushik App
June 9, 2025 at 04:15 AM
*ऊस शेतीमधील ‘एआय’साठी आज ‘व्हीएसआय’मध्ये होणार करार*
➖➖➖➖➖➖➖
दिनांक : 9-June-25
सौजन्य : अॅग्रोवन
➖➖➖➖➖➖
ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराचे तंत्र राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी), बारामती यांच्यामध्ये आज (ता. ९) सामंजस्य करार होणार आहे.या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून राज्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात या तंत्राची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. ‘व्हीएसआय’च्या मांजरी बुद्रुक येथील मुख्यालयात सकाळी ११ वाजता ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.व्हीएसआय, एडीटी, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. साखर कारखाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करण्यासाठी इच्छुक असलेल्या आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांशी करार करतील. त्यांना या तंत्राचा वापर करण्यासाठी मदत करतील.तसेच ग्रामीण भागातील विविध वित्तीय संस्था शेतकऱ्यांना यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतील, असे अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने या सर्व घटकांना चर्चासत्रात सहभागी करून घेण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, एडीटीचे विश्वस्त प्रतापराव पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत.
➖➖
*राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US