Krushik App
Krushik App
June 10, 2025 at 04:34 AM
*‘एआय’ आधारित शेतीस लाभणार आर्थिक हातभार* ➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 10-June-25 सौजन्य : सकाळ ➖➖➖➖➖➖ राज्याच्या ऊस शेतीला संजीवनी देण्याची क्षमता असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्राची वाट सुकर करणारे विविध निर्णय राज्य सरकार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने जाहीर केले. हे तंत्र सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी बारामती येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) व व्हीएसआय या दोन संस्थांमध्ये सोमवारी (ता.९) करार झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यासंबंधीच्या घोषणा करण्यात आल्या.ए.आय. आधारित ऊसशेती प्रसारासाठी व्हीएसआयमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय सहकारी महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशन (विस्मा) बी.बी.ठोंबरे, राज्य शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख व महासंचालक संभाजी कडू पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.“ पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ए.आय. तंत्र पोहोचवण्याचे उद्दीष्ट आहे. या तंत्रासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. व्हीएसआय दहा हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टरी ९२५० रुपये देणार आहे. साखर कारखाने ६७५० रुपये देणार आहेत. म्हणजे शेतकऱ्याला केवळ ९ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे,`` असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.व्हीएसआय दहा हजार शेतकऱ्यांसाठी एकूण सव्वा नऊ कोटी रुपये खर्च करणार आहे, तर उरलेल्या ९० हजार शेतकऱ्यांना राज्य सरकार बिनव्याजी हेक्टरी १० हजार रुपये कर्ज देईल. त्याची वेळेवर परतफेड केली नाही तर मात्र १२ टक्के व्याज भरावे लागेल. राज्य सरकार या कर्जासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांची तरतूद करेल, असे श्री. पवार म्हणाले. ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन आहे, त्यांनीच ए.आय. तंत्र राबवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. ➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा*. 📱📱📱 ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
😮 1

Comments