
Krushik App
June 10, 2025 at 11:57 AM
*आजचा कृषी सल्ला*
➖➖➖➖➖➖
*हळद पिक सल्ला*
खत व्यवस्थापन
हळद या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्यकता असते. माती परीक्षणानुसार संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत. एकरी ८० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश खतमात्रांची आवश्यकता आहे. यापैकी संपूर्ण स्फुरद (५० किलो स्फुरद - ३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि संपूर्ण पालाशची मात्रा (५० किलो पालाश - ८३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्र खताचा निम्मा हप्ता (४० किलो नत्र - ८७ किलो युरिया) हळद पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेले अर्धे नत्र (४० किलो नत्र - ८७ किलो युरिया) भरणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावे. त्या वेळी एकरी ६०० ते ८०० किलो करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी.
➖➖➖➖➖➖
*आले पिक सल्ला*
खत व्यवस्थापन
आले या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्यकता असते. माती परीक्षणानुसार संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत. एकरी ४८ किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खतमात्रांची आवश्यकता असते. यापैकी संपूर्ण स्फुरद (३० किलो स्फुरद - १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि पालाशची मात्रा (३० किलो पालाश - ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्र खताचा निम्मा हप्ता (२४ किलो नत्र - ५२ किलो युरिया) आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेले अर्धे नत्र (२४ किलो नत्र - ५२ किलो युरिया) भरणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावे. त्या वेळी एकरी ६०० ते ८०० किलो करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी.
➖➖
*राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US