
डिजिटल शेतकरी
June 15, 2025 at 02:58 AM
*विदर्भात मान्सूनची दमदार एन्ट्री; पुढील ५ दिवस यलो अलर्ट वाचा सविस्तर*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
विदर्भातील उकाड्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अखेर मृग नक्षत्राने दिलासा दिला आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील ५ दिवसांसाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट जारी केला आहे.
मृग नक्षत्राच्या आगमनानंतर अखेर विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. शनिवार १४ जूनपासून ते बुधवार १८ जूनपर्यंत अमरावती विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.आता खरीप हंगामाला गती मिळण्याची शक्यता आहे
*उशिरा का होईना, मृगाचा जोरदार प्रवेश*
१२ जून रोजी दुपारनंतर अमरावती विभागातील अनेक भागांत मृग नक्षत्राचा पाऊस कोसळला. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तसेच पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही आशेचा किरण दिसू लागला आहे. यापूर्वी, मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरही १२ जूनपर्यंत बराचसा भाग कोरडा होता.
*पेरणीसाठी योग्य संधी*
पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत पेरणीला गती येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारनंतर पावसाचा जोर अधिक वाढणार आहे, त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे.
शेतकऱ्यांनी योग्य वेळ साधून पेरणीची तयारी ठेवावी, असे कृषी विभागाचे आवाहन आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचे निर्देश
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी. शेतीसाठी काम करताना वीजपुरवठा सुरु असेल, तर कामे थांबवावीत आणि सुरक्षित आश्रयस्थानी थांबावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
*शेतकऱ्यांना दिलासा*
मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासा देणारा ठरणार आहे. लागवडीच्या तयारीला आता वेग येण्याची शक्यता असून, चांगल्या सुरुवातीसाठी शेतकरी सज्ज आहेत.
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W