डिजिटल शेतकरी
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 15, 2025 at 03:03 AM
                               
                            
                        
                            *पीएम किसान योजनेतील 'या' शेतकऱ्यांकडून होतेय हफ्त्यांची वसुली!*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
पुढील काही दिवसांत पीएम किसान सन्मान (PM Kisan) निधीचा २० वा हप्ता येणार आहे. दरम्यान, अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीएम किसान योजनेच्या रकमेची वसुली केली जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून देखील वसुली केली जात आहे. 
अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) २० व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या महिन्यात हा हफ्ताही वितरित होणार असल्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी जे अपात्र शेतकरी आहेत, त्यांच्याकडून पीएम किसान  (PM Kisan Yojana) हफ्त्यांची वसुली करण्याची मोहीम सुरु आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आधी योजनेतून बाद केले जाणार असल्याची चर्चा आहे. 
दुसरीकडे या मोहिमेला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. या मोहिमेतील अधिकारी वसुलीवर जास्त भर देत नसल्याचे दिसून येत आहे. कारण वसुलीसाठी अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर तरतूद नाही. कारण हे काम पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांना स्वतः पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत. तर सरकारने त्यांची आधी पडताळणी करून या योजनेतून का काढून टाकले नाही, असे विचारत आहेत. 
*अशी मोहीम सुरु आहे.* 
या योजनेतून अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यासाठी सरकारने जमिनीच्या नोंदी पडताळणी सुरू केली आहे. याशिवाय पाच टक्के शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी आवश्यक झाले आहे. ग्रामसभेतील लाभार्थ्यांच्या यादीचे ऑडिट करून ती पंचायतींमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना अपात्र शेतकऱ्यांबद्दल माहिती मिळू शकेल. 
*पीएम किसानमध्ये एवढी रक्कम वसूल* 
या योजनेत सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उच्च उत्पन्न गट असलेले जसे की आयकरदाते, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, राज्य/केंद्र सरकार, घटनात्मक पद धारक लाभार्थी शेतकरी अपात्र आहेत. अशा देशभरातील अपात्र लाभार्थ्यांकडून ४१६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        3