
डिजिटल शेतकरी
June 16, 2025 at 08:40 AM
*राज्यासाठी पुढील 48 तास धोक्याचे, मुसळधार पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात हवामानात मोठा बदल जाणवत आहे. मागील 48 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला आहे. मात्र गारवा न वाढता उकाडा कायम आहे. पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा जोर वाढल्याने कोकण व अरबी समुद्रावर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, हवामान विभागाने पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे असल्याचा हायअलर्ट जारी केला आहे.
*कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा*
हवामान विभागानुसार, 16 आणि 17 जून रोजी कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर संततधार पावसासह काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 16 ते 18 जून दरम्यान मध्यम ते तीव्र पाऊस, तर काही भागांत अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहणार असल्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची विनंती करण्यात आली आहे.
*मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस*
मुंबई, ठाणे आणि पालघर येथे 16 जून रोजी मध्यम ते तीव्र पाऊस अपेक्षित आहे. 17 ते 19 जूनदरम्यान या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. समुद्रकिनारी आणि निचऱ्याच्या भागात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावरही पावसाचा जोर
पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर 16 ते 19 जून दरम्यान काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. या शहरांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
*उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक भागात पावसाचा इशारा*
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये 16 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर 17 ते 19 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये 16 जून रोजी 30-40 किमी/तास वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव** या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.
*मराठवाडा आणि विदर्भात हवामान अस्थिर*
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जून रोजी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस, तर 17 ते 19 जूनदरम्यान हलक्या सरी पडतील.
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा इ. जिल्ह्यांमध्ये 16 जून रोजी 40-50 किमी/तास वेगाने वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस, तर 17 ते 19 जूनदरम्यान काही भागात मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
*सावध राहा! - हवामान विभागाचं आवाहन*
हवामान विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाने देखील संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W