डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
June 17, 2025 at 03:03 AM
*सोलापुरात आवक वाढली, दर घसरले, लासलगाव कांदा बाजारात काय दर मिळतोय?* *🌾डिजिटल शेतकरी🌾* आज 16 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 51 हजार झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 900 रुपये दर मिळाला. तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 600 रुपये तरी सरासरी 1600 रुपये दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याला येवला (Yeola Bajar Samiti) बाजारात कमीत कमी 150 रुपये तर सरासरी 1225 रुपये, कळवण बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1400 रुपये, चांदवड बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1370 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी 600 रुपये, तर सरासरी 1500 रुपये आणि देवळा बाजारात कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1550 दर मिळाला. तर लाल कांद्याला (Lal Kanda Market) धुळे बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1300 रुपये, नागपूर बाजारात कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी 1400 रुपये दर मिळाला. आज पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 500 रुपये तरी सरासरी 1250 रुपये दर मिळाला. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

Comments