
डिजिटल शेतकरी
June 17, 2025 at 03:09 AM
*आता फिरते पशुचिकित्सा पथकावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी यांना मिळणार संधी*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेंतर्गत (Mukhyamantri Pashu Swastha Yojana) पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यात आले आहे. सदर फिरते पशुचिकित्सा पथकांवर आता कंत्राटीतत्त्वावर नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यास येत आहे.
मुख्यमंत्री पशू स्वास्थ योजनेंतर्गत 'फिरते पशुचिकित्सा पथक'कार्यान्वित आहे. त्यानुसार पशुपालकांच्या (Animal Husbundry) दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा पोहोचते आहे. या फिरते पशुचिकित्सा पथकासोबत सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पुरेशा प्रमाणात सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नव्हती.
परिणामी फिरतेपशुचिकित्सा पथकांवर(Firate Pashuchikista Pathak) सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी बाहयस्त्रोताव्दारे नोंदणीकृत पशुवैद्यकांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुसार "सदर पशुचिकित्सा पथकांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी/कर्मचारी उपलब्ध मनुष्यबळातून नियुक्त करण्यास...
तसेच उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्यास, बाहयस्त्रोताव्दारे कंत्राटीतत्त्वावर नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकांची प्रचलित धोरणानुसार मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे"
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W