Maharashtra Pharmacy
May 21, 2025 at 06:06 PM
आज झालेल्या चर्चेनुसार, महाराष्ट्रातील फार्मसी पदवीधरांना अधिक संधी मिळाव्यात, यासाठी आपण खालीलप्रमाणे कृतीशील होणे गरजेचे आहे:
1. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा:
नवीन आलेल्या सेवा प्रवेश नियमांमध्ये ज्या पोस्टसाठी फार्मसी विद्यार्थी पात्र आहेत, त्या सर्व ठिकाणी फार्मसी (D. Pharm / B. Pharm) विद्यार्थ्यांना समाविष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र फार्मसी फोरमच्या अधिकृत लेटरपॅडवरून निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सादर करणे गरजेचे आहे.
ज्यांच्याकडे यासंदर्भात कोणतेही पुरावे किंवा उदाहरणे असतील, त्यांनी ती कृपया लवकरात लवकर पाठवावीत. हे पुरावे निवेदनासोबत संलग्न करण्यात येतील.
2. PCI (Pharmacy Council of India) कडे पाठपुरावा:
यापूर्वी ठरल्याप्रमाणे, PCI कडे देखील आपण पाठपुरावा करणार आहोत. मी स्वतः PCI प्रेसिडेंट श्री. मोंटू पटेल यांना या प्रकरणाची माहिती देऊन मेसेज पाठवलेला आहे.
जर उद्यापर्यंत प्रतिसाद प्राप्त झाला नाही, तर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील फार्मसी विद्यार्थ्यांच्या वतीने एक मेसेज कॅम्पेन राबवू, आणि PCI कडून याबाबतचे अधिकृत पत्र घेण्यासाठी पुढाकार घेऊ.
महत्त्वाची कृती:
PCI प्रेसिंडेन्ट मेसेज कॅम्पेनसाठी तयार रहा – नमुना मजकूर दिला जाईल.
निवेदनाच्या अंतिम मसुद्यासाठी संमती द्या.
आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यासच फार्मसी विद्यार्थ्यांचा आवाज शासन आणि PCI पर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकेल.
आदित्य वगरे
👍
4