Maharashtra Pharmacy
6.9K subscribers
About Maharashtra Pharmacy
👉अचूक,अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव 👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप (MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT 📢Maharashtra Pharmacy Social Media Accounts 📌 WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029VamuQgkFnSzAPg03fC2T 📌 Google Play App https://play.google.com/store/apps/details?id=com.lfaxxo.ingvyl 📌 TELEGRAM https://t.me/PHARMACYMAHARASHTRA 📌 Instagram https://www.instagram.com/maharashtrapharmacy?igsh=MXRhdXh4N3ljNjMweQ== 📌 YouTube Channel https://youtube.com/@maharashtrapharmacy?si=3w_iD6H6mY1H09B1 जय महाराष्ट्र
Similar Channels
Swipe to see more
Posts
कारागृह डॉक्युमेंट वेरिफिकेशन प्रथम कारागृह परीक्षा घेण्यात यावी यासाठी मी वारंवार संबंधित कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला. त्यानंतर निकाल लवकर लागावा यासाठीही मी सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्रात यासाठी एकमेव ठाम पाठपुरावा करणारा मीच होतो, हे मी ठामपणे सांगू शकतो. या प्रक्रियेत मी एकटा असू शकतो, पण माझ्या सर्व फार्मसी बांधवांसाठी मी सदैव उपलब्ध आहे. त्यामुळे डॉक्युमेंट वेरिफिकेशन प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कृपया माझ्याशी त्वरित संपर्क साधा.

GPAT परीक्षा केंद्र – पुणे ज्यांची GPAT परीक्षा पुणे केंद्रावर आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा! निशुल्क निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपर्क करा: 9923804473
वरील Drug Inspector बॅचमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे पण अजून प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड झालेले नाहीत, त्यांनी कृपया त्वरित माझ्याशी संपर्क साधावा. @adityavagare

✨ Recruitment Alert ✨ Post: #Drugs_Inspector (Medical Devices) By UPSC on behalf of CDSCO Eligibility: #BPharm Freshers Eligible Total Vacancies: 20 Posts Application Dates: 24th May to 12th June 2025 Notification Released by: #UPSC Post Created by: #CDSCO Exam Scheme & Syllabus: To be Notified Soon Exam Date: To be Announced Don’t miss this golden opportunity! Stay updated & join the mission to serve public health!

GPAT Exam साठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या ऐपतीनुसार जवळपास २५ विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची निशुल्क सोय केली होती. यावेळी ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी संपर्क साधला होता, परंतु सर्वांची सोय करणे शक्य झाले नाही याची खंत आहे. येणाऱ्या काळात माझ्या क्षमतेनुसार मी विद्यार्थ्यांना शक्य तितके सहकार्य करत राहीन. आपल्या सर्वांच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! – आदित्य वगरे
पुणे स्थित औषध निरीक्षक (Drug Inspector) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सूचना! विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव फक्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या उमेदवारांसाठी एक स्वतंत्र Telegram ग्रुप तयार करण्यात येत आहे. या ग्रुपचे प्रमुख उद्दिष्ट: पुण्यात ऑफलाइन निशुल्क Test Series राबवणे व त्याद्वारे Drug Inspector चा अंतिम टप्प्यातील अभ्यास अधिक परिणामकारक बनवणे! सूचना: जे उमेदवार सध्या पुणे शहरात राहत आहेत त्यांनी तात्काळ संपर्क साधावा, कारण ग्रुपमध्ये प्रवेश केवळ पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच घेतले जाईल. संपर्क: Telgegram @maharashtrapharmacy1
CDSCO DI भरती – फार्मसी क्षेत्रावर अन्याय! मित्रांनो, काल प्रसिद्ध झालेल्या CDSCO अंतर्गत "Drugs Inspector (Medical Devices)" या भरतीमध्ये अशा अनेक शाखांना सेवा प्रवेश नियमांद्वारे पात्र ठरवले गेले आहे, ज्यांचा फार्मसीशी थेट संबंधच नाही! पदाचं नावच "Drugs Inspector" असून, ही भरती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) अंतर्गत घेतली जाते. त्यामुळे ही पदे फार्मसी पदवीधारकांसाठीच अधिक योग्य ठरतात. 2019 आणि 2023 च्या भरतीतुन निवड झालेले अनेक DI सध्या याच मेडिकल डिव्हाइसेस विभागातच काम करत आहेत – इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून फार्मसीला का डावलले जात आहे हा स्पष्टपणे फार्मसी क्षेत्रावर अन्याय आहे CDSCO DI चा अभ्यासक्रम पूर्णतः फार्मसीविरोधी! – त्यात फार्मसीशी संबंधित कोणतेही प्रकरण समाविष्ट नाही. वैद्यकीय उपकरणांची देखरेख, मूल्यांकन, निरीक्षण या कामांसाठी फार्मसी पदवीधारक अधिक प्रशिक्षित, अनुभवी व सक्षम असतात. इतर शाखांचे उमेदवार लॉबी करतात, एकवटतात आणि आपल्या हक्कांसाठी लढतात. आपण मात्र – फूट, निष्क्रियता आणि एका ग्रुपमध्ये दुसऱ्याविरुद्ध अफवा पसरवण्यातच गुंतलेली तुलना – इतर शाखांशी: MPSC FSO भरती – B.Sc Agriculture ही फार्मसीशी थेट असंबंधित शाखा असूनही, ५० पेक्षा अधिक विद्यार्थी निवडले गेले. त्यांची संघटनशक्ती, प्रयत्नशीलता आणि सामूहिक दबाव हे मुख्य कारण ठरलं! उत्तरदायी कोण? आपल्या क्षेत्रातील अनेक संघटनांची निष्क्रियता PCI सारख्या मातृतुल्य संस्थेची आपल्या क्षेत्राकडे विशेषतः विद्यार्थ्यांकडे असलेले दुर्लक्ष.. आणि आपल्यातलेच काही अतिशहाणे ज्यांना काही कळत नाहीत असे चमकोगिरी करणारे काही लोक – जे परिस्थिती समजून न घेता, विद्यार्थ्यांना चुकीच्या दिशेने फार्मसी चे शाश्वत भविष्य न बघता भरकटवत आहेत. आता तरी शुद्धी यावी: लढा ही एकवटूनच जिंकता येतो. आपले हक्क मागण्यासाठी – प्रबळ आवाज, संयमित आक्रमकता आणि सामूहिक कृती आवश्यक आहे. आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या पुढील पिढ्यांचा हक्कच नष्ट होईल. वेळ आली आहे – एकत्र येण्याची, आवाज उठवण्याची, आणि आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभं राहण्याची! फार्मसीचा सन्मान राखायचा असेल – तर तो एकवटूनच राखता येईल. ✍️ – आदित्य वगरे
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA अजून अधिकृत सविस्तर अपडेट साठी आपल्या वरील टेलिग्राम चैनल ला सुद्धा Join करून घ्या
आज झालेल्या चर्चेनुसार, महाराष्ट्रातील फार्मसी पदवीधरांना अधिक संधी मिळाव्यात, यासाठी आपण खालीलप्रमाणे कृतीशील होणे गरजेचे आहे: 1. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा: नवीन आलेल्या सेवा प्रवेश नियमांमध्ये ज्या पोस्टसाठी फार्मसी विद्यार्थी पात्र आहेत, त्या सर्व ठिकाणी फार्मसी (D. Pharm / B. Pharm) विद्यार्थ्यांना समाविष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र फार्मसी फोरमच्या अधिकृत लेटरपॅडवरून निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सादर करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे यासंदर्भात कोणतेही पुरावे किंवा उदाहरणे असतील, त्यांनी ती कृपया लवकरात लवकर पाठवावीत. हे पुरावे निवेदनासोबत संलग्न करण्यात येतील. 2. PCI (Pharmacy Council of India) कडे पाठपुरावा: यापूर्वी ठरल्याप्रमाणे, PCI कडे देखील आपण पाठपुरावा करणार आहोत. मी स्वतः PCI प्रेसिडेंट श्री. मोंटू पटेल यांना या प्रकरणाची माहिती देऊन मेसेज पाठवलेला आहे. जर उद्यापर्यंत प्रतिसाद प्राप्त झाला नाही, तर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील फार्मसी विद्यार्थ्यांच्या वतीने एक मेसेज कॅम्पेन राबवू, आणि PCI कडून याबाबतचे अधिकृत पत्र घेण्यासाठी पुढाकार घेऊ. महत्त्वाची कृती: PCI प्रेसिंडेन्ट मेसेज कॅम्पेनसाठी तयार रहा – नमुना मजकूर दिला जाईल. निवेदनाच्या अंतिम मसुद्यासाठी संमती द्या. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यासच फार्मसी विद्यार्थ्यांचा आवाज शासन आणि PCI पर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकेल. आदित्य वगरे