Maharashtra Pharmacy
May 25, 2025 at 01:36 PM
CDSCO DI भरती – फार्मसी क्षेत्रावर अन्याय! मित्रांनो, काल प्रसिद्ध झालेल्या CDSCO अंतर्गत "Drugs Inspector (Medical Devices)" या भरतीमध्ये अशा अनेक शाखांना सेवा प्रवेश नियमांद्वारे पात्र ठरवले गेले आहे, ज्यांचा फार्मसीशी थेट संबंधच नाही! पदाचं नावच "Drugs Inspector" असून, ही भरती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) अंतर्गत घेतली जाते. त्यामुळे ही पदे फार्मसी पदवीधारकांसाठीच अधिक योग्य ठरतात. 2019 आणि 2023 च्या भरतीतुन निवड झालेले अनेक DI सध्या याच मेडिकल डिव्हाइसेस विभागातच काम करत आहेत – इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून फार्मसीला का डावलले जात आहे हा स्पष्टपणे फार्मसी क्षेत्रावर अन्याय आहे CDSCO DI चा अभ्यासक्रम पूर्णतः फार्मसीविरोधी! – त्यात फार्मसीशी संबंधित कोणतेही प्रकरण समाविष्ट नाही. वैद्यकीय उपकरणांची देखरेख, मूल्यांकन, निरीक्षण या कामांसाठी फार्मसी पदवीधारक अधिक प्रशिक्षित, अनुभवी व सक्षम असतात. इतर शाखांचे उमेदवार लॉबी करतात, एकवटतात आणि आपल्या हक्कांसाठी लढतात. आपण मात्र – फूट, निष्क्रियता आणि एका ग्रुपमध्ये दुसऱ्याविरुद्ध अफवा पसरवण्यातच गुंतलेली तुलना – इतर शाखांशी: MPSC FSO भरती – B.Sc Agriculture ही फार्मसीशी थेट असंबंधित शाखा असूनही, ५० पेक्षा अधिक विद्यार्थी निवडले गेले. त्यांची संघटनशक्ती, प्रयत्नशीलता आणि सामूहिक दबाव हे मुख्य कारण ठरलं! उत्तरदायी कोण? आपल्या क्षेत्रातील अनेक संघटनांची निष्क्रियता PCI सारख्या मातृतुल्य संस्थेची आपल्या क्षेत्राकडे विशेषतः विद्यार्थ्यांकडे असलेले दुर्लक्ष.. आणि आपल्यातलेच काही अतिशहाणे ज्यांना काही कळत नाहीत असे चमकोगिरी करणारे काही लोक – जे परिस्थिती समजून न घेता, विद्यार्थ्यांना चुकीच्या दिशेने फार्मसी चे शाश्वत भविष्य न बघता भरकटवत आहेत. आता तरी शुद्धी यावी: लढा ही एकवटूनच जिंकता येतो. आपले हक्क मागण्यासाठी – प्रबळ आवाज, संयमित आक्रमकता आणि सामूहिक कृती आवश्यक आहे. आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या पुढील पिढ्यांचा हक्कच नष्ट होईल. वेळ आली आहे – एकत्र येण्याची, आवाज उठवण्याची, आणि आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभं राहण्याची! फार्मसीचा सन्मान राखायचा असेल – तर तो एकवटूनच राखता येईल. ✍️ – आदित्य वगरे
👍 💯 29

Comments