Maharashtra Pharmacy
June 15, 2025 at 05:11 AM
मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे, ते केवळ एक अनुभव नाही, तर माझ्या आयुष्याचं, ध्येयाचं आणि संघर्षाचं प्रामाणिक दर्शन आहे. 🟢मित्रांनो, मी गेल्या वीस दिवसांमध्ये जे काही अनुभवलं आणि गेल्या चार-पाच वर्षांपासून जे काही काम करत आहे, त्याचा थोडक्यात अनुभव मी आज तुम्हाला सांगत आहे.✅ गेल्या चार-पाच वर्षांपासून मी महाराष्ट्रातील हजारो फार्मसी विद्यार्थ्यांसाठी निस्वार्थ सेवा करत आलो आहे — ना पगार, ना मानधन, ना जाहिरात, ना कुठलाही आर्थिक पाठिंबा… फक्त एक विश्वास — "विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आपण झिजलो तरी चालेल. ✅ मी काय केलं? 🔹 जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, केंद्र सरकार, महानगरपालिका भरती — जिथे फार्मसीच्या जागा होत्या, त्या प्रत्येक ठिकाणी मी मोफत बॅचेस, टेस्ट सिरीज, मार्गदर्शन सत्रं घेतली, आणि वैयक्तिक पर्सनल मेंटोरशिप प्रोव्हाइड केली. 🔹 एकाही विद्यार्थ्यांकडून — कधीही शुल्क घेतले नाही. प्रत्येक गोष्ट – वेळ, श्रम, खर्च – स्वतःच्या खिशातून. 🔹 पुण्यातील फार्मसी सन्मान सोहळा — सुमारे जवळपास ५ लाख रुपयांचा खर्च — फक्त माझ्या स्वतःच्या पैशातून. ना फंडिंग, ना स्पॉन्सर — हे सर्व स्वप्रेमातून आणि जबाबदारीतून. 📜 विद्यार्थ्यांसाठी केलेल्या गोष्टी: 🔸 भरती प्रक्रिया सुरू होण्यापासून निकाल लागेपर्यंत – पूर्ण मार्गदर्शन 🔸 डॉक्युमेंट वेरिफिकेशन, जॉइनिंगसाठी मदत, राहण्याची सोय 🔸 मंत्रालयात सतत फेऱ्या, अधिकाऱ्यांशी भेटी, पाठपुरावा 🔸 पोस्टर्स, प्रिंटिंग, कॉल्स, समन्वय – सगळं स्वतःच केलं, स्वतःच्या श्रमांतून आणि घरखर्चातून 😔 पण… कुणी साथ दिली का? ❌ नाही. जे ग्रुपच्या मार्गदर्शनाने फार्मसी ऑफिसर झालेले , ना कोणती संस्था, ना राजकीय मदत, ना कोणती जाहिरात. 👉 कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करायचा असेल किंवा काही करायचं असेल, तर स्वतःचा प्रवास, वाहन, राहणं, खाणं, – सगळं स्वखर्चाने.... 🟢 का केलं हे सगळं?✅ एकच विचार: “जर एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलणार असेल, तर माझा आराम कमी झाला तरी चालेल.” मी ना व्यवसायिक आहे, ना माझ्याकडे फंडिंग आहे — पण माझं पूर्ण लक्ष विद्यार्थ्यांच्या भल्यावर आहे 🔹 मी कोण आहे? मी सरकारी अधिकारी नाही, उद्योजक नाही. मी एक बेरोजगार युवक आहे. पण मी रिकामा नाही — मी एक सेवक आहे. कधी कॉल घेतो, कधी मार्गदर्शन करतो, कधी मानसिक आधार देतो — हेच माझं आयुष्य आहे 📆 माझं शेड्युल – सेवा की स्वतःच्या आरोग्याचा घात? ▶️ रात्री २ ला झोपणं, सकाळी ७ ला उठणं ▶️ दिवसभर १००+ मेसेजेसना उत्तरं & दिवसभरात शेकडो कॉल.. ▶️ ग्रुपला प्रत्येक मेसेज पाठवण्याआधी ३-४ तास अभ्यास ▶️ स्क्रीन टाइम – १० तासांच्या आसपास ▶️ स्वतःचे वैयक्तिक ना Instagram, ना WhatsApp, ना स्टेटस… हे सगळं — विद्यार्थ्यांसाठी. ⚠️ मग घडलं काय… या सततच्या धकाधकीमुळे — माझ्या शरीरानं एकदाच सांगितलं — "पुरे आता!" यापूर्वी वयाच्या 11 व्या वर्षी म्हणजेच 18 वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो त्याची लहानपणाची आठवण झाली.… कारण कधी न झालेली तीव्र डोकेदुखी, थकवा, मानसिक ओझं — प्रबळ इच्छाशक्ती समोर ठेवून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होता, फार्मासिस्ट मित्रांच्या सल्ल्याने काही औषधं घ्यावी लागली, मोबाईलचा कसल्याही प्रकारे वापर न करता झोप पूर्ण करून आराम करावा लागला.... तेव्हा लक्षात आलं — 👉 "तू लोकांसाठी झिजतो आहेस, पण स्वतःला विसरलास." 🪞 माझं आत्मपरीक्षण – मी काय शिकलो? 1. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. झोप, आहार, व्यायाम — हे पर्याय नाहीत, गरजा आहेत. 2. आपल्या शरीराला मर्यादा असतात — त्या ओळखा, मान्य करा. 3. आपलं काम प्रसिद्धीसाठी करू नका — ध्येयासाठी करा. 4. माणुसकी जपा — द्वेष, टोमणे, मत्सर यांना जागा नको. 5. शब्द हे शस्त्र असतात — तोडण्यासाठी नाही, उभारण्यासाठी वापरा. 👁️‍🗨️ समाजाच्या नजरा… ज्यांच्यासाठी १६-१८ तास झिजतो, तेच विचारत नाहीत — "तुम्ही इतक्या लोकांना सहकार्य कस करता..? तुम्हाला विश्रांती मिळते का?" काही जण म्हणतात – “मोठे मेसेज टाकतो ग्रुपला…” हो, टाकतो — कारण त्या मागे तितका मोठा अभ्यास, अनुभव आणि अक्कल लागते. काहीजण माझं काम पाहून त्रासतात — कारण त्यांना मी प्रामाणिकपणे करत असलेलं परोपकाराचं कार्य पाहून अस्वस्थ वाटतं. ❤️ माझा अंतिम संदेश… ✅ झोपेची तडजोड करू नका ✅ वेळेवर आहार घ्या ✅ शरीर ऐकत नसेल, तर थांबा ✅ ज्याचं काम समजत नाही, त्याचं अपमान करू नका ✅ स्वतःची मर्यादा ओळखा ✅ प्रेम करा, आधार बना, उभं राहा – एकमेकांसोबत 🛑 हा डोकेदुखीचा त्रास नव्हता तर… हि एक आयुष्याची समज होती — "तू काय करत आहेस?" या प्रश्नाचं उत्तर देणारं. 💬 "मी थांबलो… पण ध्येय थांबलेलं नाही." मी पुन्हा उभा राहीन — थोडा थांबून, थोडा शहाणा होऊन. मी एक बेरोजगार युवक आहे — पण हजारो विद्यार्थ्यांसाठी आधार आहे. आता मी चालत राहीन — थोडा थांबून… पण ध्येय कायम ठेवून.. ✍️ – आदित्य वगरे
❤️ 🙏 👍 65

Comments